साकोली : कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन कर्मचाऱ्यांना काम करताना बराच अडचणीचा सामना करावा लागतो. त्या अशा परिस्थितीत सर्वात जास्त संक्रमणाची भीतीसुद्धा फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनाच असते. अशा परिस्थितीत नगरपरिषदेचे कर्मचारी असोत पोलीस कर्मचारी असोत किंवा आरोग्य कर्मचारी असेल प्रत्येकांना आपल्या स्वतःची काळजी करून आपले कर्तव्य पार पाडावे लागते. अशा वेळेस कर्मचाऱ्यांना स्वतःची स्वच्छता व निगा राहण्याकरिता नगर परिषद साकोली येथे स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले. विप्रो कंपनीकडून स्वच्छता किट वितरित करण्यात आले. व्यवस्थापक प्रमोद दक्षिणकर यांच्या हस्ते नगरपरिषद येथे स्वच्छता किटचे वितरण करण्यात आले. यावेळेस नगर परिषद साकोलीचे मुख्य अधिकारी माधुरी मडावी प्रशासकीय अधिकारी स्वप्नील हमाने, लेखाधिकारी पंकज माने, अभियंता शुभम दुरकर, अभियंता येवतकर तसेच राजेश बैस, प्रताप मल्लानी, नवीन अग्रवाल, शहीद कुरेशी व नगरपरिषद साकोलीचे कर्मचारी उपस्थित होते.
साकोली येथे स्वच्छता किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST