मासळ येथे धम्मदीक्षा प्रमाणपत्राचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:36 IST2021-04-02T04:36:43+5:302021-04-02T04:36:43+5:30
मासळ : शाक्यवंश बौध्द विहार मासळ येथे धम्मदीक्षा प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष ...

मासळ येथे धम्मदीक्षा प्रमाणपत्राचे वितरण
मासळ : शाक्यवंश बौध्द विहार मासळ येथे धम्मदीक्षा प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष प्राणहंस मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात महासचिव हरकर उके,डॉ. भैय्यालाल गजभिये, पृथ्वीराज वैद्य आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मासळ येथील २८ बौध्द उपासकांना धम्मदीक्षा प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी पृथ्वीराज वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली बुध्दवंदना व धम्मवंदना घेण्यात आली. याप्रसंगी डॉ. भैय्यालाल गजभिये व पृथ्वीराज वैद्य यांनी उपस्थित बौद्ध उपासकांना धम्मदीक्षा घेण्याचे विस्तृत महत्त्व भाषणातून सांगितले. बौध्दाचार्य हरकर उके यांनी २२ प्रतिज्ञांचे वाचन केले व उपस्थितांनी प्रतिज्ञांचे ग्रहण केले. प्राणहंस मेश्राम यांनी अध्यक्षीय भाषणातून बौद्ध धम्माचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाक्यवंश समाज कार्यकारिणी मासळचे जयंत मेश्राम, सुभाष अडिकने, हंसराज वैद्य, संगीता मेश्राम, धनविजय गोस्वामी, भूमिका गोस्वामी, प्रणीत गोस्वामी, डिगांबर सतदेवे, पुष्पा वैद्य, वंशिका गोस्वामी, सुरेंद्र पिल्लेवान, विशुध्दानंद पिल्लेवान, जयदीप सोनपिंपळे, मयूर भांबोरे, विमल रंगारी, राजहंस रामटेके, गोपाल मेश्राम, ओमदास आडिकने, प्रभावती सुखदेवे आदींनी सहकार्य केले. बुध्दवंदना घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.