वलनी गावावर कोसळले विसर्जनाचे विघ्न

By Admin | Updated: September 28, 2015 00:52 IST2015-09-28T00:52:29+5:302015-09-28T00:52:29+5:30

शाळा शिकणाऱ्या सवंगड्यांनी बालहौस म्हणून गणपतीची स्थापना केली. त्याची दहा दिवस मोठ्या श्रध्देने आराधना केली.

The disruption of collapsed damages on the village of Valeni | वलनी गावावर कोसळले विसर्जनाचे विघ्न

वलनी गावावर कोसळले विसर्जनाचे विघ्न

अशोक पारधी  पवनी
शाळा शिकणाऱ्या सवंगड्यांनी बालहौस म्हणून गणपतीची स्थापना केली. त्याची दहा दिवस मोठ्या श्रध्देने आराधना केली. मात्र, नियतीला त्यांची आराधना मान्य नव्हती. विसजर्नाच्या दिवशीच दोन चिमुकल्या बालकांवर काळाने झडप घातली. याप्रसंगामुळे वलनी येथील नागरिकांवर शोककळा पसरली आहे.
तालुक्यातील वलनी (चौ.) येथील गांधी विद्यालयात शिकणारे दोन शालेय विद्याथी समीर मनोज जनबंधू (१४) गौरव संदीप मेश्राम (१२) असे मृतक बालकांचे नाव आहेत. गणपती विसर्जनासाठी वलनी घाटावर बालमित्र गेले असता बुडून दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती होताच गावातील आबालवृध्दांनी नदी घाटाकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत बराच उशिर झाला होता. या घटनेमुळे जनबंधू व मेश्राम कुटुंबावर मोठा आघात झाला. दोन्ही चिमुकल्यांची आईवडील पार शोकसागरात बुडाली होती. त्यांनी फोडलेल्या टाहोमुळे उपस्थितांची मने हेलावली. त्यांना सावरताना सर्वांची हृदय दाटून आल्याने डोळ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. समीर आठवीत तर गौरव पाचव्या वर्गाचा विद्यार्थी होता. दुरुन वाहत येणारा गणपती समिरच्या पायाला लागला. त्याला ढकलण्यासाठी तो माघारी फिरला. तो गणपतीसोबत वाहून जाताना पाहून गौरवनेही त्याचेकडे धाव घेतली व समीर व गौरव दोघेही वाहत जाताना सोबत असलेल्या मुलांनी पाहिले. त्यांनी गावात येवून लोकांना सांगितले. ग्रामस्थ व मुलांच्या घरच्यांनी नदीघाटाकडे धाव घेऊन शोधाशोध केली. मात्र, तोपर्यंत बराच उशिर झाला होता. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी धरमशी, पोलीस निरीक्षक मधुकर गिते, बीट जमादार गोंडाणे व अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दिवसभर पवनी व कोदुर्ली गावातील ढिवर समाजाचे गोताखोर नदीमध्ये खूप दूरपर्यंत शोध घेत होते. वलनी (चौ.) गावावर हा फार मोठा आघात असल्याने गावात शोककळा पसरली आहे.

Web Title: The disruption of collapsed damages on the village of Valeni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.