१५ गावांचा वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 00:44 IST2016-06-30T00:44:16+5:302016-06-30T00:44:16+5:30
वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करण्यासाठी सिहोरा परिसरात नव्याने तीन फिडर तयार करण्यात आले आहेत.

१५ गावांचा वीज पुरवठा खंडित
तीन फिडर बंदच : ४७ गावांसाठी केवळ तीन फिडर, विजेचा लपंडाव सुरू
चुल्हाड (सिहोरा) : वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करण्यासाठी सिहोरा परिसरात नव्याने तीन फिडर तयार करण्यात आले आहेत. परंतु या फिडरांना सुरू करण्याची मंजुरी मिळाली नाही. यामुळे एका गावासाठी १५ गावांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे संकट ओढावले आहे.
सिहोरा परिसरातील वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करण्यासाठी स्थानिक वीज वितरण कार्यालयातील प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करित आहे. या कार्यालयात सिहोरा १ आणि २ अशी विभागणी करण्यात आली असून स्वतंत्र शाखा अभियंते कार्यरत आहेत. या विभागांना गावांना जोडण्यात आले आहे. ४७ गावांना सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी बपेरा, सिहोरा आणि चांदपूर अशी तीन जुनी फिडर आहेत. एका फिडरला सरासरी १५ गावांना जोडण्यात आले आहे. या फिडरमधून घरगुती वीज ग्राहक, कृषी पंपधारक शेतकरी, व्यवसायीक तथा अन्य ग्राहकांना विजेचा पुरवठा उपलब्ध करण्यात आला आहे. एका गावात वीज प्रवाहात तांत्रिक बिघाड येताच अन्य १५ गावांचा विज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. यामुळे १७ ते २० हजार नागरिकांना अंधारांचा सामना करण्याची वेळ येत आहे.
या फिडरचा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी स्थानिक कार्यालय मार्फत जिल्हा कार्यालयाला सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. पत्रव्यवहाराचे ढिग तयार झाले आहे. परंतु जिल्हा कार्यालयाला मंजुरीची परवानगी देणारी 'अॅलर्जी' असल्याचे दिसून येत आहे. फिडर तयार असताना वीज पुरवठा सुरू करण्यास स्थानिक कार्यालयाची यंत्रणा उत्सुक असताना जिल्हा महावितरणची यंत्रणा यामुळे नागरिकांत रोष निर्माण झाला आहे. दरम्यान परिसरात वारंवार विजेच्या लपंडावाचे चित्र असताना सत्ताधारी पुढारी शांत आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)
सिहोरा परिसरात तीन नव्याने फिडर तयार करण्यात आले असताना विज पुरवठा सुरू करण्याची मंजुरी देण्यास निष्क्रियता दाखविण्यात येत असल्याने खपवून घेतले जाणार नाही. यासाठी रास्ता रोको आंदोलनाची भूमिका घेतली जाईल.
-राजेंद्र पटले, जिल्हाप्रमुख, शिवसेना, भंडारा.