शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखाच्या वादात कंत्राटदाराचा शेल्याने गळा आवळून निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST

नीळकंठ फागाे बाहे (५४), रा. म्हाडा काॅलनी, रामनगर, खात राेड, भंडारा, असे मृताचे नाव आहे, तर फुलचंद सुखराम बांते (४८), रा. ओमनगर खाेकरला, भंडारा आणि त्याचा साथीदार तेजराम अरुण धुर्वे (३४), रा. पचखेडी, ता. भंडारा, अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. भंडारा तालुक्यातील दवडीपार दर्ग्याच्या मागील जंगलात मालीपार कालव्यात एक अनाेळखी मृतदेह पडून असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली.

ठळक मुद्देदाेघांना अटक : मालीपार कालव्यात आढळला मृतदेह

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कंत्राटदाराचा शेल्याने गळा आवळून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी ६ वाजता भंडारालगतच्या मालीपार तलावाच्या कालव्यात उघडकीस आली. उसने दिलेले एक लाख रुपये मागितल्यावरून हा खून झाल्याचे पुढे आले असून, पाेलिसांनी याप्रकरणी दाेघांना अटक केली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.नीळकंठ फागाे बाहे (५४), रा. म्हाडा काॅलनी, रामनगर, खात राेड, भंडारा, असे मृताचे नाव आहे, तर फुलचंद सुखराम बांते (४८), रा. ओमनगर खाेकरला, भंडारा आणि त्याचा साथीदार तेजराम अरुण धुर्वे (३४), रा. पचखेडी, ता. भंडारा, अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. भंडारा तालुक्यातील दवडीपार दर्ग्याच्या मागील जंगलात मालीपार कालव्यात एक अनाेळखी मृतदेह पडून असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यावरून पाेलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी फाेटाे साेशल मीडियावर पाेस्ट करण्यात आले. काही वेळातच हा मृतदेह कंत्राटदार नीळकंठ बाहे याचा असल्याचे पुढे आले. मात्र, त्याचा खून कुणी आणि कशासाठी केला, हे कळायला मार्ग नव्हता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नीळकंठ याच्या घराच्या परिसरात चाैकशी सुरू केली. गाेपनीय माहितीच्या आधारे उसने दिलेल्या एक लाख रुपयांसाठी हा खून झाल्याचे पुढे आले. पाेलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे फुलचंद बांते याला ताब्यात घेतले. त्याची चाैकशी केली असता ताे उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे त्याची कसून चाैकशी करण्यात आली. पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली, तसेच या खुनात तेजराम धुर्वे याने मदत केल्याचे सांगितले. त्यालाही तात्काळ अटक करण्यात आली.नीळकंठ बाहे हा कंत्राटदारीचे कामे करीत हाेता. बीएसएनएल कंपनीचे केबल लाइन टाकण्याचे कंत्राट त्याने घेतले हाेते. काही दिवसांपूर्वी आराेपीला एक लाख रुपये उसने दिले हाेते. या पैशाची मागणी नीळकंठ वारंवार करीत हाेता. त्यामुळेच त्याचा काटा काढण्याचा या दाेघांनी निश्चय केला आणि गळा आवळून त्याचा निर्घृण खून केला.घटनास्थळाला पाेलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पाेलीस अधिकारी संजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे जयवंत चव्हाण यांनी भेट दिली. अधिक तपास कारधाचे ठाणेदार दीपक वानखेडे, पाेलीस उपनिरीक्षक विवेक राऊत, तुळशीराम माेहरकर, नितीन महाजन, पाेलीस नायक नंदू मारबते, गाैतम राऊत, कैलाश पटाेले, स्नेहल गजभिये, अशाेक सराेते, संदीप भानारकर, मंगेश माळाेदे, काैशिक गजभिये करीत आहेत.

एलसीबीने केले अवघ्या तीन तासांत आराेपी जेरबंद मालीपार तलावाच्या कालव्यात अनाेळखी मृतदेह आढळल्यानंतर ओळख पटवून अवघ्या तीन तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आराेपींना अटक केली. विशेष म्हणजे सुरुवातीला मृतदेहाची ओळखही पटत नव्हती. साेशल मीडियातून ओळख पटली. मात्र, पाेलिसांपुढे आराेपी शाेधण्याचे माेठे आव्हान हाेते. स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारावर आराेपींचा शाेध घेतला. याप्रकरणी दाेघांना अटक करण्यात आली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी