शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतीमध्ये कामगारांच्या प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 05:00 IST

कामगार न्यायालयाचे न्या. रोहिणी भोसले नरसाळे यांच्या मदतीने याप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यास संदर्भातले प्रकरण असताना लोकअदालतमध्ये फक्त दोन तासांच्या प्रयत्नांनंतर मध्यस्थीने प्रकरणात समेट घडवून आणण्यात आले. लोकअदालतमध्ये प्रथमच मध्यस्थी प्रक्रियेचा वापर करण्यात आला. या बाबीला यशही लाभले.  पॅनल सदस्य म्हणून ॲड. दिवान निर्वाण, नत्थुजी खंडाईत यांनी प्रकरण समेटसाठी सहकार्य केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील औद्योगिक व कामगार न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये नऊ प्रकरणे आपसी समजुतीने निकाली काढण्यात आले. औद्योगिक न्यायालयाचे न्या. अतुल के. शाह यांनी अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या प्रकरणात हा वाद सामंजस्याने सोडविण्यासाठी मध्यस्तीचा वापर करीत प्रकरण मार्गी काढले. कामगार न्यायालयाचे न्या. रोहिणी भोसले नरसाळे यांच्या मदतीने याप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यास संदर्भातले प्रकरण असताना लोकअदालतमध्ये फक्त दोन तासांच्या प्रयत्नांनंतर मध्यस्थीने प्रकरणात समेट घडवून आणण्यात आले. लोकअदालतमध्ये प्रथमच मध्यस्थी प्रक्रियेचा वापर करण्यात आला. या बाबीला यशही लाभले.  पॅनल सदस्य म्हणून ॲड. दिवान निर्वाण, नत्थुजी खंडाईत यांनी प्रकरण समेटसाठी सहकार्य केले. या प्रकरणात न्या. रोहिणी भोसले यांनी गैरअर्जदारविरुद्ध समन्स काढल्यामुळे आदेशाची गंभीरता कळली. अवघ्या २४ तासांत मजुरांच्या थकबाकीची रक्कम मंजूर करून घेऊन ती न्यायालयामार्फत तिन्ही पक्षकारांना प्रदान करण्यात आले. लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी औद्योगिक व कामगार न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही न्यायालयांचे न्यायालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले. याशिवाय प्रकाश चांदेकर, अविनाश देशमुख, मनोज बावनकर, भेंडारकर, प्रिया पाली, जाणे यांनी सहकार्य केले. पक्षकारांचे अधिवक्ता म्हणून ॲड. विजय दलाल, ॲड. विनय भोयर, ॲड. निचकवडे, ॲड. ऋषिकेश गुप्ते, ॲड. सचिन राघोर्ते, ॲड. शिशिर वंजारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांचेही लोकअदालतीमध्ये सहकार्य लाभले. लोकअदालतीमुळे नागरिकांची प्रकरणे तातडीने निकाली निघण्यास मदत होत आहे.

सहा वर्ष प्रलंबित प्रकरणे निकाली- तीन कामगारांचे सहा वर्षांपासूनचे प्रकरणे प्रलंबित होते. तेही आपसी समझोत्याने निकाली काढण्यात आले. यात इस्तारी भोयर, शेषराव भोंदे आणि रामभाऊ मते यांचे डिसेंबर २०१४ पासूनचे मजुरीची रक्कम थकबाकी होती. फळ रोपवाटिका विभाग आधार विभागाद्वारे उशिरा का होईना? या तिन्ही प्रकरणात १५ लाख ९० हजार रकमेचे प्रकरण निकाली निघाले.

 

टॅग्स :Lokadalatलोकअदालत