भंडारा नगरपालिका बरखास्त करा
By Admin | Updated: May 18, 2016 00:34 IST2016-05-18T00:34:08+5:302016-05-18T00:34:08+5:30
ठोक बाजाराच्या नावावर पैसा लाटण्यासाठी मिळविलेली जमीन शासनाची परवानगी न घेता सर्वसाधारण सभेत ठराव ....

भंडारा नगरपालिका बरखास्त करा
प्रकरण मार्केट जागेवरील बांधकामाचे
भंडारा : ठोक बाजाराच्या नावावर पैसा लाटण्यासाठी मिळविलेली जमीन शासनाची परवानगी न घेता सर्वसाधारण सभेत ठराव पारित करुन भाडेतत्त्वावर हस्तांतरीत करण्यात आलेली जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शासनजमा करण्यात आली. अशा तकलादू निर्णय घेणाऱ्या भंडारा नगरपालिकेच्या प्रशासनाला बरखास्त करुन संबंधितांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत केली आहे.
यावेळी भाजपचे डॉ. प्रकाश मालगावे, आबीद सिद्दीकी, विकास मदनकर, शितल तिवारी, अरुण भेदे, आशु गोंडाणे उपस्थित होते. विशेष म्हणजे या प्रकरणाला घेवून नगर परिषदेने केलेल्या फसवणुकीबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १४ मे रोजी भाजपच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. डॉ. मालगावे म्हणाले, भंडारा पालिकेने जलशुध्दीकरण संयत्र व बगीच्यासाठी शासनाने दिलेल्या भंडारा नझुल शिट नं. ५४ भूखंड क्रमांक २०/४ आराजी १.५० एकर जागेला पालिकेने बेकायदेशीररित्या ठराव करुन सदर जमीन बीटीबी भाजीपाला व्यापारी अशोसिएशन या संस्थेबरोबर भाजीमार्केट बांधकामासाठी करारनामा २४ जुलै रोजी करण्यात आला. या सर्व प्रक्रियेत गंभीर अनियमितता केली असल्याचे मत जिल्हाधिकारी यांनी नोंदवून सदर जागा शासनास परत करण्याविषयी व जागेवर सुरु असलेले बांधकाम तातडीने थांबविण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्या आदेशाचे पालनही करण्यात आले. स्वमालकीची जागा नसतानाही परस्पर जाहिरात देवून जागा हस्तांतरीत करण्याचा ठराव करणे, न.प. च्या सर्व सदस्यांवर मुख्यधिकारी यांच्यावर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी, प्रक्रियेत झालेला भष्ट्राचार शोधून काढणे तसेच सदर प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे किंवा भ्रष्टाचार निरोधक कक्षाकडे हस्तांतरण करावे अशी मागणी पत्रपरिषदेत करण्यात आली. (प्रतिनिधी)