उमेदवारांना बसणार असंतुष्टांचा फटका

By Admin | Updated: June 24, 2015 01:13 IST2015-06-24T01:13:15+5:302015-06-24T01:13:15+5:30

जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला केवळ दहा दिवस शिल्लक आहेत.

Disgruntled candidates will sit for candidates | उमेदवारांना बसणार असंतुष्टांचा फटका

उमेदवारांना बसणार असंतुष्टांचा फटका


भंडारा : जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला केवळ दहा दिवस शिल्लक आहेत. असे असले तरी भाजप व्यतिरिक्त काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप संपूर्ण उमेदवारांची यादी घोषीत केलेली नाही. त्यामुळे उमेदवारी मिळणार की नाही या संभ्रमात उमेदवार आहेत. काँग्रेसने उमेदवारी नाकारली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी लढण्यासाठी काही जण इच्छूक आहेत. काँग्रेसचा आलेख राष्ट्रवादी काँग्रेसनेही काही ठिकाणचे बी फार्म रोखून ठेवले आहे. असे असले तरी ज्यांनी निवडणुकीची तयारी करुन नामांकन दाखल केले आहे ते निवडणूक लढणार असल्यामुळे या निवडणुकीत सर्वच पक्षातील उमेदवारांना असंतुष्ठांचा फटका बसणार आहे.
खरीपाच्या हंगामाला सुरुवात झालेली असताना जिल्हा परिषद निवडणूक आल्यामुळे या निवडणुकीच्या धामधुमीत पाहिजे तेवढा उत्साह ना मतदारांमध्ये आहे ना कार्यकर्त्यांमध्ये दिसत नसल्याचे चित्र आहे. लोकसभा आणि विधानसभेतील विजयानंतर भाजपमध्ये उमेदवारांची रांगच रांग होती. त्यामुळे कोण उमेदवार निवडून येऊ शकतो, या भर देत उमेदवारी जाहीर केले आहे. असे असले तरी उमेदवारी वाटपात सामाजिक संख्याबळामुळे काहींच्या उमेदवारी कापण्यात आल्याचा प्रकार भाजपासह काँग्रेस पक्षात दिसून आला. सामाजिक संख्या बळामुळे एखादा उमेदवार जिल्हा परिषदेत निवडून आला तर पाच वर्षांनंतर येणाऱ्या निवडणुकीत तो डोके वर काढू शकतो, या भीतीमुळे विद्यमान लोकप्रतिनिधींनी समोर राजकारण डोळ्यासमोर ठेऊन खेळी आखलेली आहे. आजचे राजकारण हे उद्याचे भवितव्य असल्याची त्यांना जाणीव आहे. तुमसर तालुक्यात एका उच्चविद्याविभूषित वकीलाने काँग्रेसची उमेदवारी मागितली होती. परंतु, उमेदवारी कापण्यात आली. त्यामागेही पक्षाचा उमेदवार पडला तरी चालेल, परंतु वकीलाला उमेदवारी द्यायची नाही, हाच निकष लावण्यात आल्याची चर्चा आहे. सध्याच्या राजकीय समीकरणात जिल्हा परिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे चित्र अस्पष्ट आहे. जातीय समीकरणाच्या आधारावर मतांचे विभाजन होणार असले तरी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची लाट निष्प्रभ ठरण्याची शक्यता अधिक आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Disgruntled candidates will sit for candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.