प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर मुंबईत होणार चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:07 IST2019-07-25T01:06:34+5:302019-07-25T01:07:17+5:30
गोसिखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत मांडलेल्या समस्यांवर पालकमंत्री डॉ. परिणय फके यांनी उपस्थितांना आश्वासन दिले. उपस्थित प्रकल्पग्रस्तांनीही झालेल्या चर्चेवर समाधान व्यक्त केले. चर्चेनुसार जुलै महिन्यातच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे आमदार बच्चू कडू यांच्या मुख्य उपस्थितीत सभा घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट आश्वासन दिले.

प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर मुंबईत होणार चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोसिखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत मांडलेल्या समस्यांवर पालकमंत्री डॉ. परिणय फके यांनी उपस्थितांना आश्वासन दिले. उपस्थित प्रकल्पग्रस्तांनीही झालेल्या चर्चेवर समाधान व्यक्त केले.
चर्चेनुसार जुलै महिन्यातच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे आमदार बच्चू कडू यांच्या मुख्य उपस्थितीत सभा घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट आश्वासन दिले.
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांमध्ये वाढीव कुटुंब म्हणून गोसीखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा २६ फेब्रुवारी २००९ ला मिळाला,त्या तारखेस १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रकल्पग्रस्तास किंवा त्याच्या अपत्यास २.९० लक्ष रुपयेचा लाभ देणे, २४५.५० मीटरच्या जलसाठ्याने बाधित होणाऱ्या गावांचे पुनर्वसन करणे, स्वयंरोजगारासाठी बिनव्याजी कर्जार्ची तरतूद करणे, पुनर्वसनाच्या लाभापासून वंचित बाधितांनी लाभ देणे, संपादित शेतीच्या कास्तकारांना प्रकल्पग्रस्ताचा संपूर्ण लाभ देणे संपादित शेतीला वाढीव आर्थिक मोबदला देणे, पुनर्वसित पर्यायी गावठाणात नागरी सुविधा प्राथमिकतेने देणे, प्रकल्पग्रस्तांना घरकुल-अन्नसुरक्षा योजना प्राधान्याने देने, पर्यायी गावठाण न दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना विशेष सानुग्रह अनुदान देऊन पुनर्वसित करणे, उर्वरीत आणि शेती करण्यास पर्याय नाही अशी नवीन शेती कायद्याने संपादित करणे, मासेमारांना मासेमारीचे अधीकार जलाशयात कायमस्वरूपी देने, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुनर्वसन यंत्रणा यांच्या स्तरावरील समस्या लवकर निपटविणे, नाग नदीच्या पाणीप्रदूषनातून गोसीखुर्द जलाशयाची सुटका करन्यासाठी नियोजित योजना तात्काळ कार्यान्वयीत करणे, आदी मागण्यांबाबत योग्य निर्णय घेण्याची कबुलीही पालकमंत्री डॉ.फुके यांनी दिली.
पालकमत्र्यांचे आश्वासन लवकर अंमलात यावे अशी मागणीही प्रहार गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे पदाधिकारी व सरपंच सहित उपस्थित प्रकल्पग्रस्तांनी वर्तविली.