प्राथमिक शिक्षकांची अधिकाऱ्यांशी चर्चा
By Admin | Updated: October 17, 2015 01:07 IST2015-10-17T01:07:30+5:302015-10-17T01:07:30+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका भंडाराच्या शिष्टमंडळाने खंडविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याशी भेट घेवून चर्चा करण्यात आली.

प्राथमिक शिक्षकांची अधिकाऱ्यांशी चर्चा
समस्या सोडविण्याची मागणी : अधिकाऱ्यांनी केले शिष्टमंडळाला आश्वस्त
भंडारा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका भंडाराच्या शिष्टमंडळाने खंडविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याशी भेट घेवून चर्चा करण्यात आली.
यात जीपीएफ, एलआयसी, शिक्षक पतसंस्था यांचे शेड्युल नियमित पाठविण्यात यावे, मुळ सेवापुस्तिका अद्ययावत करून दुय्यम सेवा पुस्तिकेत नोंद घेण्यासंबंधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे, दरमहा हस्तलिखित वेतन देयके मागण्यात येवू नये, शालेय पोषण आहार मानधन नियमितपणे काढण्यात यावे, निवड श्रेणी प्रशिक्षणाला शिक्षकांची यादी जिल्हा परिषदकडे पाठविण्यात यावे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. सेवापुस्तिकेचे अद्ययावातीकरण करण्यासाठी पुढील आठवड्यापासून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षकांनी कार्यशाळेला येताना मुळ कागदपत्रे घेवून यावे, असेही सांगण्यात आले. शिष्टमंडळात शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय बनकर, दिलीप गभने, महेश यावलकर, अनमोल रंगारी, दिलीप बावनकर, श्रावण हजारे, नामदेव गभने, प्रभु तिघरे, सुधीर वाघमारे, माधव पोले, गोवर्धन साठवणे आदी उपस्थित होते. संचालन प्रभु तिघरे तर आभार प्रदर्शन महेश यावलकर यांनी केले. (नगर प्रतिनिधी)