कास्ट्राईब संघटनेची आरोग्य संचालकाशी चर्चा

By Admin | Updated: October 27, 2016 00:33 IST2016-10-27T00:33:05+5:302016-10-27T00:33:05+5:30

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या / मागण्या संदर्भात राज्याचे आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार यांच्या दालनात कास्ट्राईब ...

Discussion with Castro's Health Director | कास्ट्राईब संघटनेची आरोग्य संचालकाशी चर्चा

कास्ट्राईब संघटनेची आरोग्य संचालकाशी चर्चा

कर्मचाऱ्यांना दिलासा : समस्या लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन
भंडारा : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या / मागण्या संदर्भात राज्याचे आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार यांच्या दालनात कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे राज्याध्यक्ष अरुण गाडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.
सभेत आरोग्य सहाय्यकांचा ग्रेड पे २,५०० वरुन २,८०० करण्यात यावा, बंधपत्रित आरोग्य सेविका यांना आरोग्य सेवेत कायम करण्यात यावे, अतिआवश्यक सेवेतील ग्रामीण भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना शासन परिपत्रकानुसार दुसऱ्या व चवथ्या शनिवारची रजा अथवा त्या दिवशीची पर्यायी रजा देण्यात यावी, आकृतीबंधनानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी, एनएचएम अंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचारी एएनएम, एलएचव्ही, एसएन यांना शासन सेवेत सेवा ज्येष्ठतेनुसार कायम करण्यात यावे किंवा सरय सेवा भरतीत प्रथम प्राधान्य देण्यात यावे, नक्षलग्रस्त भागात कार्यरत एएनएम, एलएचव्ही, एसएन यांना सन २००७ पासून नक्षलग्रस्त वेतनाची थकबाकी देण्यात यावी, आरोग्य सहाय्यीका यांना विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात यावी, पीटीए यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी तसेच रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी, महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, ग्रामीण भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याकरिता कार्यवाही करण्यात यावी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावी, तालुकास्तरावर आरोग्य सहाय्यीका, आरोग्य सेवक, सेविका यांचे पदे निर्माण करून ते तातडीने भरण्यात यावी, यासह इतर आरोग्याविषयी प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन संचालक डॉ.सतीश पवार यांनी संघटनेला दिले.
चर्चेदरम्यान संघटनेचे अतिमहासचिव गजानन थुल, उपमहासचिव सूर्यकांत हुमणे, जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, प्रदीप लोखंडे, शशीकांत अडसड, अशोक म्हैसकर, महासचिव प्रभाकर जिवने, विभागीय सचिव सीताराम राठोड, विभागीय अध्यक्ष कृष्णा मसराम, विभागीय महिला अध्यक्ष कविता मडावी व इतर जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी सभेला प्रामुख्याने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Discussion with Castro's Health Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.