अपहरणाची तक्रार बनावट असल्याचे उघड

By Admin | Updated: December 10, 2015 00:55 IST2015-12-10T00:55:05+5:302015-12-10T00:55:05+5:30

शनिवारला शाळेतच न गेल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी वडीलाने मारले व घराबाहेर पडून बराच वेळ झाल्याने आणखी वडील मला मारतील या भीतीपोटी व वडीलांची सहानुभूती मिळावी म्हणून...

The disclosure of the abduction is fake; | अपहरणाची तक्रार बनावट असल्याचे उघड

अपहरणाची तक्रार बनावट असल्याचे उघड


तुमसर : शनिवारला शाळेतच न गेल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी वडीलाने मारले व घराबाहेर पडून बराच वेळ झाल्याने आणखी वडील मला मारतील या भीतीपोटी व वडीलांची सहानुभूती मिळावी म्हणून माझा अपहरणाचा प्रयत्न झाल्याची बनावटी कहाणी सांगितल्याची कबुली खुद्द बालकानेच पोलिसांना दिली. त्यामुळे अपहरणाच्या नाट्यावर पडदा पडला.
तुमसर रोड (देव्हाडी) येथील रोहित मेश्राम (१५) हा नवव्या वर्गात शिकत असून तो दि. ५ डिसेंबरला सकाळी शाळेतच गेला नसल्याची बाब रोहितच्या वडीलांना कामावरून परत आल्यानंतर कळली. तोपर्यंत रोहित झोपेत गेला होता. दरम्यान दुसऱ्या दिवशी दि. ६ डिसेंबरला रोहित सकाळी उठल्यानंतर त्याच्या वडीलांनी शाळेत का गेला नाही असे विचारून रोहितला दोन चार लगावले. त्यामुळे रोहित रडत रडत घराबाहेर निघून गेला होता. दुपारचे १ वाजले होते. परंतु रोहित घरी गेलाच नाही. परत घरी जाणार व वडील आपल्याला मारतील ही भीती रोहितला सतावत होती. वडीलांनी आपल्याला मारू नये, जवळ घेऊन वडीलांनी सहानुभूती दर्शवावी याकरिता रोहितने अपहरणाचा प्रयत्न झाल्याची बनावटी कहाणी बनवून त्याने आपल्या वडीलांना सांगितले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The disclosure of the abduction is fake;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.