सुंदर आयुष्यासाठी शिस्त आवश्यक
By Admin | Updated: January 23, 2016 00:52 IST2016-01-23T00:52:41+5:302016-01-23T00:52:41+5:30
शालेय जीवनापासून प्रत्येकालाच शिस्तीचे धडे गिरविले जातात. मात्र याकडे कुणी गांभीर्याने तर कुणी सहजतेने पाहतात.

सुंदर आयुष्यासाठी शिस्त आवश्यक
कापगते स्मृती प्रतिष्ठानचा सत्कार सोहळा : नाना पटोले यांचे प्रतिपादन
साकोली : शालेय जीवनापासून प्रत्येकालाच शिस्तीचे धडे गिरविले जातात. मात्र याकडे कुणी गांभीर्याने तर कुणी सहजतेने पाहतात. शेवटी ज्यांनी शिस्त अवलंबिली त्यांचे आयुष्य सुंदर झाली तर ज्यांनी शिस्त पाळली नाही, ते जीवनात अयशस्वी झाले.
समाजात वावरताना दुखी, असहाय्य शोषीत व पिडीतांना मदत केली पाहिजे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी मार्तंडराव कापगते स्मृती प्रतिष्ठान साकोलीच्या वतीने मार्तंडराव कापगते विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जांभळी सडक येथे आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय स्थानाहून व्यक्त केले. यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून आ. बाळा काशीवार, माजी आमदार व्ही.यु. डायगव्हाणे, यशोदा कापगते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश सूर्यवंशी, सचिव प्राचार्य होमराज कापगते, प्राचार्य शाम ठवरे, डॉ. वामनराव डोंगरवार, परशुराम लांजेवार, जासवंद कापगते, पी.बी. फुंडे, राजेश धुर्वे, प्रा. आर.एस. शहारे, ज्ञानेश्वर गौपाले, उपसभापती लखन बर्वे उपस्थित होते. यावेळी उद्घाटीय भाषणातून आ. बाळा काशीवार म्हणाले की, सध्याचे विज्ञान युग असून या युगात शिक्षणाला फार महत्व आहे. शिकून मोठे होणेही प्रत्येकाची ईच्छा आहे. मात्र मोठे झाल्यावर आई-वडिलांच्या विसर पडणे दुर्देवी बाब आहे. दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची संख्या सातत्याने वाढत आहे. या वृद्धाश्रमात एकाही शेतकऱ्यांचे आईवडील राहत नाही. त्यामुळे शिकून मोठे झालेल्यानी याचाही विचार करावा.
प्रास्ताविकातून होमराज कापगते म्हणाले की, माजी आमदार स्व. मार्कंड कापगते हे समाजसेवा करतानी लोकांची कामे कधी होतील, त्यांना शासकीय योजनांचा लाभ कसा देता येईल या प्रयत्नात ते सदैव होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांनी केलेल्या कार्याची आठवण लोकांना राहावी हे प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. सोहळ्याचे हे सातवे वर्ष असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिक म्हणून डॉ. महादेव कापगते सेंदुरवाफा के.वाय. घोरमारे कुंभली, सुमित्रा तिरपुडे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती जांभळी, मोतीराम भोंडे सातलवाडा, एकनाथ लांजेवार निलज, आदर्श शेतकरी पुरस्कार रामचंद्र कापगते, खंडाळा, आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर यांना देण्यात आला तर याच वेळी गुणवंत विद्यार्थ्यालाही सत्कार करण्यात आला. रजतपदक, शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. संचालन अर्चना बावणे व रूपेश कापगते यांनी केले. आभार अर्चना बावने यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)