आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर
By Admin | Updated: June 3, 2016 00:38 IST2016-06-03T00:38:23+5:302016-06-03T00:38:23+5:30
विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देता यावे याकरिता नवयुवकांना प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनातर्फे राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर
भंडारा : विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देता यावे याकरिता नवयुवकांना प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनातर्फे राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन व प्रशिक्षण शिबिर पावसाळा सुरु व्हायच्या अगोदर आयोजित करण्यात येते व यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनेतील निवडक स्वयंसेवकांचा समावेश करून घेण्यात येतो.
या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरात एनडीएफ तर्फे प्रशिक्षण दिल्या जाते. शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी असणाऱ्या वीस रासेयो स्वयंसेवक आणि दहा स्वयंसेविकांची प्रत्येक जिल्ह्यातून निवड करण्यात येते.
शिबिरात आग, पूर, भूकंप, सर्पदंश, रस्ता अपघात व इतर अनेक प्रकारच्या आपत्तीमध्ये स्वत:चा व दुसऱ्यांचा जीव कसा वाचवावा याबद्दल प्रशिक्षण दिल्या जाते. यावर्षी हे शिबिर पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तर्फे दि. ५ ते १४ जून २०१६ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे व यात सहभागी होण्याकरिता भंडारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील तीन हजार दोनशे पैकी तीस उत्कृष्ट स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. याकरिता भंडारा येथील स्थानिक जे.एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे व भंडारा जिल्हा रासेयो समन्वयक डॉ.राजेंद्र शाह यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठ नियमांनुसार निवड करण्यात आली.भंडारा जिल्ह्यातील १७ विविध महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांचा या चमूमध्ये समावेश आहे. सदर चमू सोबत यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालय, लाखांदूर येथील रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.राकेश ठाकरे हे व्यवस्थापक म्हणून राहणार आहेत. पूर्वतयारी म्हणून निवडलेल्या चमूला मार्गदर्शन करण्यात आले. याकरिता बाजीराव कारंजेकर फार्मसी महाविद्यालय साकोलीचे प्रा.सातपुते, एन.पी. वाघाये महाविद्यालय लाखनीचे गणेश कापसे व प्रगती महिला महाविद्यालय भंडारा येथील प्रा.कृष्णा पासवान उपस्थित होते. रासेयोचे स्वयंसेवक जितसिंग लिल्हारे, हेमंत देवगडे, शुभांगी साकुरे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)