सिहोरा परिसरात ढोरफोडीची जागा बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:35 IST2021-03-26T04:35:24+5:302021-03-26T04:35:24+5:30
सिहोरा परिसरातील गावात नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन स्तरावरून शासकीय जागा राखीव करण्यात आलेल्या आहेत. विविध स्तरावर जागेची नोंद ...

सिहोरा परिसरात ढोरफोडीची जागा बेपत्ता
सिहोरा परिसरातील गावात नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन स्तरावरून शासकीय जागा राखीव करण्यात आलेल्या आहेत. विविध स्तरावर जागेची नोंद तलाठी दस्तऐवजात असल्याचे दिसून येत आहे. परंतु प्रत्यक्षात दस्तऐवजात नोंद असणारी जागा गावात उपलब्ध नाही. गावांत आधी शौचालय निर्मितीचे योजना नव्हते, यामुळे पोटखराब म्हणून जागा राखीव करीत या जागेचा उपयोग शौचालय करीता होत होते. यामुळे परिसरातील गावात ०.३५ आर जागेची नोंद पोटखराब अशी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात जनावरे पालनपोषण करण्यात येत असल्याने त्यांचे मृत्यूनंतर विल्हेवाट लावण्यासाठी ढोरफोडीकरिता जागा राखीव असल्याची नोंद आहे. परिसरातील १३ गावात १२ हेक्टर ५२ आर जागा राखीव करण्यात आली आहे. एका गावात चक्क ३ हेक्टर ५७ आर जागा असल्याचे दिसून येत आहे. परंतु या गावात ही जागा उपलब्ध असल्याचे दिसून येत नाही. आठ गावात खतकुड्यासाठी ९ हेक्टर १७ आर जागा राखीव असल्याची नोंद आहे. जनावरांचे शेण, मलमूत्र साठवणूक करण्यासाठी ही जागा उपलब्ध करण्यात आली होती. काही गावात जागा उपलब्ध आहे. परंतु बहुतांश गावात ही जागा अतिक्रमणात गेली आहे. अतिक्रमणाचा फटका सर्वाधिक मरगडकरिता राखीव जागेला बसला आहे.
या परिसरातील गावात ३३९ हेक्टर ०७ आर जागा राखीव करण्यात आल्याची नोंद आहे. एका गावात ३७ हेक्टर २२ आर जागेची नोंद मरगड अशी आहे. परंतु बहुतांश जागा शेत शिवाराच्या अतिक्रमणमध्ये गेली आहे. कुरण चराईकरिता ४३८ हेक्टर ३३ आर जागा राखीव असून वन व झुडपी जंगल अशी नोंद आहे. यात महसूल विभागाच्या बहुतांश जागेचे हस्तांतरण वन विभागाला झाले आहे. ९५१ हेक्टर ९५ आर जागेत वन असून वैनगंगा, बावणथडी नदी, नाल्यात ५९२ हेक्टर ४६ आर जागा आहे.
बॉक्स
बागायती शेती नदी पात्रात गिळंकृत
बपेरा गावात ८७ एकर बागायती शेती नदी पात्रात गिळंकृत झाली आहे. नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. शासनाने शेतसारा माफ केले आहे. आधी कालावधीपासून नागरिकांना सोई व सुविधा उपलब्ध करण्यासाठी जागा राखीव करण्यात आल्या होत्या, त्या आज घडीला उपलब्ध नाहीत. गाव व गावांचे शिवारात वन, कुरण चराई, मरघड, तलाव, अमराई, सडक रस्ते, शाळा, नहर, नदी नाला, पडीक जमीन, अकृषक, लागवडी क्षेत्र, गावठाण, झुडपी जंगल, ढोरफोडी, खतकुडे, आखर गोठाण, पोटखराब, भारत सरकार, पहाड खडक, काबिल कास्त, आबादी, अशा प्रकारच्या जागा राखीव करण्यात आलेल्या होत्या, प्रत्यक्षात राखीव जागा गावात उपलब्ध नाही. अतिक्रमणमध्ये जागा गेली आहे.