नियमित डॉक्टरअभावी रुग्णांची गैरसोय

By Admin | Updated: August 26, 2015 00:26 IST2015-08-26T00:26:24+5:302015-08-26T00:26:24+5:30

पाच गावांचा संगम असलेल्या उसर्रा येथील व परिसरातील एकमेव असलेल्या आयुर्वेदिक रुग्णालयात नियमित डॉक्टर नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

Disadvantages of patients without regular doctors | नियमित डॉक्टरअभावी रुग्णांची गैरसोय

नियमित डॉक्टरअभावी रुग्णांची गैरसोय


उसर्रा : पाच गावांचा संगम असलेल्या उसर्रा येथील व परिसरातील एकमेव असलेल्या आयुर्वेदिक रुग्णालयात नियमित डॉक्टर नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.
उसर्रा येथे जिल्हा परिषदेचे आयुर्वेदिक रुग्णालय गेल्या ४० वर्षापासून आहे. सदर रुग्णालयात सर्व औषधीयुक्त सोयींनी युक्त आहे. आयुर्वेद चिकित्सा घेण्यासाठी परिसरातील उसर्रा, काटेबाम्हणी, सालई (बु), टाकला, टांगा, सालई (खुर्द), सिहरी आदी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात.
येथील कार्यरत डॉक्टर यांना आठवड्यातून दोन ते तीन दिवस प्राथमिक आरोग्य केंद्र जांब येथे प्रतिनियुक्तीवर बोलावण्यात येते. त्यामुळे सदर डॉक्टरांना त्या ठिकाणी जावे लागत असल्यामुळे सतत उसर्रा येथील दवाखाना बंद असतो. त्यामुळे परिसरातील रुग्ण नियमित डॉक्टर नसल्याने निराश होऊन परत जातात.
तसेच येथील रुग्णालयात हिवताप आरोग्य अधिकारी यांची जागा रिक्त आहे. याशिवाय याच उपकेंद्रातील आरोग्य सेविका गैरहजर आहे. सध्या रुग्णालयात एकही आरोग्य सेविका उपलब्ध नाही. त्यामुळे गरोदर स्त्रियांची गैरसोय होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Disadvantages of patients without regular doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.