ंप्रमाणपत्रासाठी अपंगांची पायपीट
By Admin | Updated: July 29, 2015 00:42 IST2015-07-29T00:42:42+5:302015-07-29T00:42:42+5:30
अपंगांसाठी अनेक योजना अस्तित्वात असल्या तरी, भंडारा जिल्ह्यातील अपंगांना शल्य चिकित्सक व इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहीचे...

ंप्रमाणपत्रासाठी अपंगांची पायपीट
असंतोष : तांत्रिक बिघाडीचा फटका
कोंढा (कोसरा) : अपंगांसाठी अनेक योजना अस्तित्वात असल्या तरी, भंडारा जिल्ह्यातील अपंगांना शल्य चिकित्सक व इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहीचे संगणीकृत प्रमाणपत्र मिळवितांना पायपीट करावी लागत आहे.
अपंगांना जिल्हा सामान्य रूग्णालयातून अपंग असल्याचे प्रमाणपत्र मिळते. आठवड्यातून बुधवारला अपंगांचे प्रमाणपत्र बनविण्यासाठी जिल्ह्यातून अनेक अपंग सामान्य रुग्णालयात जातात. येथे अस्थीरोगतज्ज्ञ डॉक्टरकडून तपासणी केल्यानंतर एक महिण्यानंतर प्रमाणपत्रासाठी बोलाविले जाते. परंतु सध्या अस्थीरोग संबंधी प्रमाणपत्र बनविण्यात अनेक अडचणी येत असल्याने सामान्य रुग्णालयात हेलपाट्या मारव्या लागत आहेत.
अस्थीसंबंधी अपंगांचे प्रमाणपत्र बनविणाऱ्या संगणकात बिघाड आल्याने प्रमाणपत्र बनत नसल्याची बाब समोर आली आहे. भंडारा येथे प्रमाणपत्र देताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप होत आहे. जवळच्या व्यक्तींना जास्त टक्के असलेले प्रमाणपत्र देतात तसेच बाहेर गावच्या लोकांना पाच वर्षाचे प्रमाणपत्र देऊन पुन्हा त्यांना बोलाविले जाते. कायम अपंगत्व असलेल्या तरूण, तरूणींना तसेच सिलेब्रल पालसी आजार असलेल्या व्यक्तीला कायम अस्थीव्यंगाचे प्रमाणपत्र देण्याची मागणी पवनी तालुक्यातील अपंग तरूण-तरूणींनी केली आहे. (वार्ताहर)