आंधळगाव ते धुसाळा रस्ता बनला चिखलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:24 IST2021-07-16T04:24:54+5:302021-07-16T04:24:54+5:30
१५ लोक ०२ के जांब / लोहारा : मोहाडी तालुक्यात येत असलेल्या आंधळगाव ते धुसाळा हा रस्ता नागपूर आणि ...

आंधळगाव ते धुसाळा रस्ता बनला चिखलमय
१५ लोक ०२ के
जांब / लोहारा : मोहाडी तालुक्यात येत असलेल्या आंधळगाव ते धुसाळा हा रस्ता नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्याला जोडला जातो. दररोज असंख्य प्रवासी या रस्त्याने ये जा करत असतात परंतु मागील ५ ते ६ वर्षांपासून या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रोड आहे हेच प्रवाशांसाठी कळेनासे झाले आहे.
आंधळगाव ते धुसाळा रस्ता चिखलमय बनल्याने जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे तक्रार धुसाळा ग्रामवासीयांनी केली आहे तरी याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन आंधळगाव ते धुसाळा रस्ता त्वरित दुरुस्ती व डांबरीकरण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते,रोहित वणवे अनिल भोयर,गणेश कोकाटे, किशोर शेंडे संदीप बंड, विजय तीतीरमारे, ईश्वर सेलोकर, श्याम कोसरे ,कमलेश निमकर, संदेश सेलोकर, सुजित गजभिये, दीपक मते,प्रमोद कोसरे, शाम चिचुलकर, पिंटू वडीचार, सारंग निशाणे, स्वप्नील सेलोकर, निकेश वणवे, सागर सिंगनजुडे, इतर धुसाळा ग्रामवासीयांनी केली आहे. या रस्त्याची दुरुस्ती केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धुसाळा ग्रामवासीयांनी दिला आहे.