शेकडो मतिमंद, मूकबधिर विद्यार्थ्यांना भोजनदान
By Admin | Updated: March 13, 2016 00:32 IST2016-03-13T00:32:34+5:302016-03-13T00:32:34+5:30
मृत्यू हा अटळ आहे, परंतु काहींचा मृत्यू मनाला सदैव आणून पोखरून टाकतात. संस्कारशील कुटुंबात जिवंतपणी त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा वसा भेलावे कुटुंबीय जोपासत आहेत.

शेकडो मतिमंद, मूकबधिर विद्यार्थ्यांना भोजनदान
कॉग्रेस पदाधिकाऱ्यांसह अनेकांची उपस्थिती
तुमसर : मृत्यू हा अटळ आहे, परंतु काहींचा मृत्यू मनाला सदैव आणून पोखरून टाकतात. संस्कारशील कुटुंबात जिवंतपणी त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा वसा भेलावे कुटुंबीय जोपासत आहेत. गरीब, रंजले-गांजले, उपेक्षितांकरिता झटावे हा मंत्र त्यांनी दिला होता. पुण्यस्मरणदिनी भेलावे कुटुंबीयांकरिता झटावे हा मंत्र त्यांनी दिला होता. पुण्यस्मरणदिनी भेलावे कुटुंबीयांनी तुमसरातील दोन शाळेतील मूकबधिर व मतिमंद मुलांना भोजनदान देऊन एक आगळे चित्र समाजासमोर ठेवले. या शाळेतील विद्यार्थ्यांना काँग्रेस कमेटीतर्फे बिस्कीट वितरित करण्यात आले.
तुमसरातील काँग्रेस नेते स्व. शिवकुमार भेलावे यांचा जागतिक महिला दिनी सहा वर्षापुर्वी भाषण देताना आकस्मिक प्रकृती बिघडून त्यांचा मृत्यू झाला होता. सहा वर्षापासून पुण्यस्मरण दिनी रक्तदान, भोजनदान, गरिबांना ऊनी कपडे तथा इतर जीवनोपयोगी वस्तु त्यांच्या कुटुंबीयाकडून वितरीत केल्या जातात. ११ मार्च रोजी भेलावे कुटुंबीयांनी तुमसरातील जानकीदेवी डुंभरे मूकबधिर व लुंबिनी मतीमंद शाळेतील विद्यार्थ्यांना भोजनदान केले. यावेळी शहरातील काँगे्रस कार्यकर्ते उपस्थित होते.
तुमसर शहर व तालुका काँग्रेस कमेटीने या विद्यार्थ्यांना बिस्कीटे व अभ्यास साहित्य वितरीत केले. स्व. भेलावे यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना वातावरण गहीवरून गेले होते. प्रास्ताविक विजय गिरीपुंजे यांनी केले.भेलावे कुटूंबातील स्रेहा भेलावे, पारस भेलावे, लिलेश्वर हुकरे, ऋतुजा भेलावे, सिंधू कुंभलकर, छाया कामडी, रजनी हुकरे, प्रतिभा बोंद्रे, प्रज्ञा भाजीपाले व काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद तितीरमारे, माजी नगराध्यक्ष प्रा. अमरनाथ रगडे, बाळा ठाकूर, नगरसेविका सविता ठाकूर, नलिनी डिंकवार, दिलीप चोपकर, सुदेश डुंभरे, संदीप डूंभरेसह मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक, तथा भंडारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)