स्पर्धेत टिकण्याकरिता डिजिटल शाळा महत्त्वाची

By Admin | Updated: May 12, 2017 01:56 IST2017-05-12T01:56:29+5:302017-05-12T01:56:29+5:30

जगाच्या बदलत्या प्रवाहात आपल्यालाही बदलायचे आहे. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील खेडी स्व:पूर्ण

Digital schools are important for the competition | स्पर्धेत टिकण्याकरिता डिजिटल शाळा महत्त्वाची

स्पर्धेत टिकण्याकरिता डिजिटल शाळा महत्त्वाची

हेमंत सेलोकर : डिजिटल शाळेचा उद्घाटन समारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : जगाच्या बदलत्या प्रवाहात आपल्यालाही बदलायचे आहे. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील खेडी स्व:पूर्ण होण्याकरीता कुठेही कमतरता राहू नये याकरीता शासन विविध उपक्रम राबवून शहरी सुविधा खेड्यातही देत आहे. शासनाच्या १४ व्या वित्त आयोगातून डिजीटल संच खरेदीची व्यवस्था करण्यात आली आहे. जि.प. च्या शाळा खाजगी शाळांच्या तुलनेत कुठेही कमी पडू नयेत याकरीता हा उपक्रम राबविल्या जात आहे.
यातून विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाची गोडी चाखायला मिळेल यात शंका नाही. पालकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकडे लक्ष पुरविण्याची नामी संधी चालून आलेली आहे. खासगीत नाहक खर्च करून जिल्हा परिषदेच्या शाळेतून वगळणे उचित होणार नाही, आदी विचार खुनारीचे सरपंच हेमंतकुमार सेलोकर यांनी जिल्हा परिषद शाळा खुनारी डिजीटल शाळा म्हणून पुढे आली आहे.
उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे उपाध्यक्ष महादेव निंबार्ते उपसरपंच खुनारी, प्रमुख पाहुणे माजी तंमुस अध्यक्ष शामराव बावनकुळे, लाला शिवणकर, प्रकाश कुंभारे, रामलाल निंबार्ते शाळेचे मुख्याध्यापक गणवीर यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या विविध अडचणीवर प्रकाश टाकत सर्वांनी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. आभार शिक्षिका रार्घाेर्ते यांनी मानले. कार्यक्रमाला पालकांची हजेरी अपेक्षित होती.

Web Title: Digital schools are important for the competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.