अन् सत्काराने दिघोरीचे पोलीस झाले भावूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:55 IST2018-11-10T21:54:30+5:302018-11-10T21:55:12+5:30

आपण आहात म्हणून कायदा व सुव्यवस्था आहे. आमच्यासाठी आपण दिवाळीसारखा सणही परिवारासोबत साजरा करू शकत नाही. त्यामुळेच आम्ही आपला गौरव करीत आहो, असे उद्गार अडानेश्वर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी काढताच दिघोरी पोलीस ठाण्यातील वातावरण भावूक झाले. निमित्त होते दिवाळी निमित्त दिघोरी ठाण्यातील सर्व पोलिसांचा दिवाळीनिमित्त गौरव सोहळ्याचे.

Dighori police felicitated and sentimental emotion | अन् सत्काराने दिघोरीचे पोलीस झाले भावूक

अन् सत्काराने दिघोरीचे पोलीस झाले भावूक

ठळक मुद्देदिवाळीत गौरव : अडानेश्वर संस्थानचा उपक्रम

मुकेश देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघोरी (मोठी) : आपण आहात म्हणून कायदा व सुव्यवस्था आहे. आमच्यासाठी आपण दिवाळीसारखा सणही परिवारासोबत साजरा करू शकत नाही. त्यामुळेच आम्ही आपला गौरव करीत आहो, असे उद्गार अडानेश्वर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी काढताच दिघोरी पोलीस ठाण्यातील वातावरण भावूक झाले. निमित्त होते दिवाळी निमित्त दिघोरी ठाण्यातील सर्व पोलिसांचा दिवाळीनिमित्त गौरव सोहळ्याचे.
पोलीस म्हणजे २४ तास आॅन ड्युटी. सुट्टी असली तरी एक प्रकारे कामावरच. सण असो, वार असो की घरी मंगलप्रसंग पोलिसांना केव्हा बोलावणे येईल हे सांगता येत नाही. अशा २४ तास आॅन ड्युटी असणाºया पोलिसांचा लाखांदूर तालुक्यातील कोच्छी येथील अडानेश्वर संस्थानने गौरव केला. या संस्थानचे पदाधिकारी थेट पोलीस ठाण्यात पोहचले. त्याठिकाणी प्रत्येक पोलिसाला पुष्पगुच्छ आणि मिठाई देवून त्यांचा गौरव केला.
कायम नागरिकांच्या उपेक्षेचे धनी असलेल्या पोलिसांना हा गौरव क्वचितच प्राप्त होतो. अशा या गौरवप्रसंगी ठाण्यातील प्रत्येकजण भाऊक झाला. सर्वप्रथम ठाणेदार एन.बी. गावंडे यांचा सत्कार शाल व श्रीफळ व मिठाई देवून करण्यात आला. त्यानंतर सर्व पोलिसांनाही गौरविण्यात आले. यावेळी अडानेश्वर संस्थानचे संजय सेलोटे, श्रीराम देसाई, राजाराम सोनटक्के, उदाराम देसाई, लक्ष्मण शेंदरे, राधेश्याम कोसरे, गणपत शहारे, अशोक देसाई, धनराज गेडामे, लंकेश देसाई, बाळू कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते. समाजात पोलिसांची प्रतिमा हवी तेवढी चांगली नाही. कोणीही पोलिसांबद्दल चांगले बोलताना दिसत नाही. मात्र खाकी वर्दीतही माणूस असतो, हे सर्वच विसरतात. खाकीतील माणसाचा गौरव म्हणजे समर्पण भावनेचा गौरव होय. अडानेश्वर संस्थानने पुढाकार घेतला आणि पोलिसांचा सत्कार करून एक नवा पायंडा निर्माण केला.

Web Title: Dighori police felicitated and sentimental emotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.