दिघोरीतील धान खरेदी केंद्र बेपत्ता
By Admin | Updated: November 12, 2014 22:39 IST2014-11-12T22:39:09+5:302014-11-12T22:39:09+5:30
शिर्षक वाचून अचंबीत झालात ना. अचंबित होऊ नका. कारण जेव्हा जेव्हा काही ठरावीक बाबीची नितांत आवश्यकता असते तेव्हा त्याची पुर्तता व्हायला बराच उशीर झालेला असतो. त्यामुळे खऱ्या

दिघोरीतील धान खरेदी केंद्र बेपत्ता
दिघोरी/मोठी : शिर्षक वाचून अचंबीत झालात ना. अचंबित होऊ नका. कारण जेव्हा जेव्हा काही ठरावीक बाबीची नितांत आवश्यकता असते तेव्हा त्याची पुर्तता व्हायला बराच उशीर झालेला असतो. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांला लाभ न मिळता तिसराच कुणीतरी फायदा घेत असतो. नेमका असाच प्रकार आधारभूत धान खरेदी केंद्राबाबत संपुर्ण दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी धानाची मळणी सुरु करुन १५ दिवस लोटले असावे, तरी अजूनपर्यंत धान खरेदी केंद्राचा पत्ता नाही. त्यामुळे खरोखरच धान खरेदी केंद्रे बेपत्ता झाली असल्याची चर्चा शेतकऱ्यांत दिसून येत आहे.
यावर्षी झालेल्या कमी पावसाने शेतकऱ्यांचे धानपीक संकटात सापडले होते. त्याही परिस्थीतीत शेतकरी डगमगला नाही. तलाव व नाले यांचेमधील पाणी इंजीनद्वारे १५० रुपये प्रति तासाने धानपीकाला पाणी देवून कसेबसे धान वाचविले. कमी झालेल्या धानाचा तोटा भरुन निघेल या भोळ्या आशेत शेतकरी दिसून येतो. मात्र धानपीक मळणी होऊन १५ ते २० दिवस लोटले असले तरी अजूनपावेतो धान खरेदी केंद्र सुरुझाले नाही. त्यामुळे मिळेल त्या भावात पडक्या दराने शेतकरी आपले धान पीक खासगी व्यापाऱ्यांना विकत आहे. शेतकऱ्यांचा जिवनमान उंचवावा, त्यांची लूट होवू नये, त्याचे धानाला योग्य भाव मिळावा, या उद्दात हेतूने शासनाने धान खरेदी केंद्राची संकल्पना अंमलात आणली. मात्र, कुंभकर्णी झोपेत असलेले लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे अजूनपावेतो धान खरेदीचा पत्ता नाही. (वार्ताहर)