परीक्षा काळात कलचाचणी वाढविणार अडचणी
By Admin | Updated: February 5, 2016 00:32 IST2016-02-05T00:32:40+5:302016-02-05T00:32:40+5:30
दहावीच्या सराव परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी मापन विषयाचे पेपर शाळा अंतर्गत गुणांच्या तोंडी परीक्षा माहिती संप्रेषण तंत्रज्ञान परीक्षा आदी ...

परीक्षा काळात कलचाचणी वाढविणार अडचणी
वाढणार ताण : संगणक प्रणालीचा वापर, शाळांमध्ये उपक्रमाची चर्चा
राजू बांते मोहाडी
दहावीच्या सराव परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी मापन विषयाचे पेपर शाळा अंतर्गत गुणांच्या तोंडी परीक्षा माहिती संप्रेषण तंत्रज्ञान परीक्षा आदी धावपळीच्या महिन्यात कल चाचणी आयोजित करायची असल्याने विद्यार्थ्यांपेक्षा मुख्याध्यापकांना मानसिक ताणातून जावे लागणार आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांची करिअर विषयक अभिरुचीचे मोजमाप करण्याच्या हेतूने मानसशास्त्रीय कसोटी घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना कलचाचणी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा माध्यमिक २०१६ च्या परीक्षेस प्रथम प्रविष्ठ होणाऱ्या सर्व नियमित विद्यार्थ्यांची कलचाचणी आॅनलाईन पद्धतीने ८ फेब्रुवारी पासून ते २५ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहे. या कलचाचणीचा शाळेच्या अभ्यासाशी किंवा नापास - पासशी काहीही संबंध नाही. मानसिक कल मोजणारी ही चाचणी विद्यार्थ्याने कोणतीही तयारी न करता अगदी सहज ही चाचणी द्यायची आहे. कलचाचणी भविष्य काळातील करिअर निवडीसाठी एक दिशादर्शक साधन आहे. पण, सदर चाचणी ही शाळा अंतर्गत आऊट आॅफटर्न परीक्षा, शाळा अंतर्गत होणाऱ्या महिला संप्रेषण तंत्रज्ञान परीक्षा श्रेणी मार्फत परीक्षा विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा, इंग्रजी, मराठी, हिंदी, गणित या विषयाच्या तोंडी बहुपर्यायी परीक्षाचे नियोजन आदी कामे फेब्रुवारी महिन्यातच करायची असतात. तसेच बऱ्याच शाळांची सराव परीक्षाही फेब्रुवारी महिन्यात होत असते.
शाळा अंतर्गत परीक्षेच्या धावपळीत कालावधीत कल चाचणी येवून धडकल्याने बऱ्याच शाळांच्या मुख्याध्यापकांना मानसिक ताण सहन करावे लागत आहे. तसेच मोहाडी तालुक्यात एकुण हायस्कुलच्या शाळा ३२ आहेत. या ३२ शाळांपैकी केवळ १४ एवढ्या शाळांमध्ये आयसीटीचे संगणक प्रयोगशाळा आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या सचिवांनी २ फेब्रुवारी रोजी कल चाचणीबाबत सूचना विभागीय मंडळाला निर्गमित केली आहे. त्यानुसार कलचाचणी करिताची संगणक प्रणाली विभागीय मंडळामार्फत शाळांना वितरित केली जाणार आहे. सर्व नियमित विद्यार्थ्यांची कलचाचणी आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहेत. कलचाचणी प्रत्येक दिवशी चार सत्रामध्ये आयोजित केली जाणार असल्याची माहिती शाळांना देण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी आॅनलाईन पद्धतीने कलचाचणी घेणे शक्य होणार नाही. त्या ठिकाणी आॅफलाईन पद्धतीने कलचाचणी घेण्यात येणार आहे.