तुमसर तालुक्यात अतिसाराचा प्रकोप

By Admin | Updated: July 20, 2016 00:20 IST2016-07-20T00:20:48+5:302016-07-20T00:20:48+5:30

तुमसर तालुक्यात अतिसारााचा प्रकोप वाढला असून तुमसर येथे उपजिल्हा रूग्णालयात ३८ रूग्ण दाखल करण्यात आले आहे.

Diarrhea outbreak in Tumsar taluka | तुमसर तालुक्यात अतिसाराचा प्रकोप

तुमसर तालुक्यात अतिसाराचा प्रकोप

नागरिकांमध्ये भीती : उपजिल्हा सामान्य रूग्णालयात ३८ रुग्ण, देव्हाडी आरोग्य केंद्रात १६ रूग्ण दाखल
तुमसर : तुमसर तालुक्यात अतिसारााचा प्रकोप वाढला असून तुमसर येथे उपजिल्हा रूग्णालयात ३८ रूग्ण दाखल करण्यात आले आहे. देव्हाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान मंगळवारी दुपारी ३ वाजता उपजिल्हा रूग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा मृत्यू अतिसाराने झाला नसून छातीत तीव्र वेदनेमुळे झाल्याचे रूग्णालय प्रशासनाचे म्हणने आहे.
तुमसर तालुक्यातील ग्रामीण परिसरात अतिसाराचा प्रकोप वाढला आहे. येरली, देव्हाडी, खापा आणि अन्य गावातील ३८ रूग्ण तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती आहे. हागवण आणि उलटीचे लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांनी रूग्णालयात धाव घेतली. देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ रूग्णांमध्ये अतिसाराची लक्षणे आढळून आली. त्यांच्यावर देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. तुमसर उपजिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तुमसर उपजिल्हा रूग्णालयात दाखल गंगा ठाकुर रा.सुभाष वॉर्ड देव्हाडी या महिलेचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू अतिसाराने झाला की जलजन्य आजारामुळे झाला की अन्य कशाने झाला, हे गुढ आहे. (तालुका प्रतिनिधी)

गंगा ठाकुर यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांना छातीत तीव्र वेदना सुरु झाल्या. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. अतिसाराने त्यांचा मृत्यू झाला नाही.
- डॉ.सचिन बाळबुद्धे,
अधीक्षक, सुभाषचंद्र बोस
उपजिल्हा रुग्णालय, तुमसर.

Web Title: Diarrhea outbreak in Tumsar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.