शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

विकेल ते पिकेल अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 05:00 IST

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विकेल ते पिकेल अभियान, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, ग्रामकृषी विकास समिती या योजनांचा यावेळी शुभारंभ झाला. यावेळी कृषी मंत्री भुसे, कृषी राज्यमंत्री तथा भंडराचे पालकमंत्री डॉ.विश्वजीत कदम, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्यासह विविध शेतकरी कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.

ठळक मुद्देकृषी आयुक्तालयाने घेतली दखल : भंडाराचा तांदूळ मिळणार थेट राज्यभरातील ग्राहकांना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतात राबून पिकविलेल्या शेतमालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असून बाजारपेठेचा कल ओळखून मुल्यसाखळी निर्माण करतांनाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी विकेल ते पिकेल अभियानाअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील शेतकरी देवानंद चौधरी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला.कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विकेल ते पिकेल अभियान, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, ग्रामकृषी विकास समिती या योजनांचा यावेळी शुभारंभ झाला. यावेळी कृषी मंत्री भुसे, कृषी राज्यमंत्री तथा भंडराचे पालकमंत्री डॉ.विश्वजीत कदम, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्यासह विविध शेतकरी कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.विकेल ते पिकेल अभियानात मुख्यमंत्री संवाद साधणार असल्याने भंडारा तालुक्यातील मुजबी येथे कृषी विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलींद लाड, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, तंत्र अधिकारी शांतिलाल गायधने, मंडळ अधिकारी विजय हुमणे, आत्माचे सतिश वैरागडे, कृषी सहाय्यक करुणा उराडे, प्रगतशिल शेतकरी देवानंद चौधरी यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.यावेळी शेतकरी देवानंद चौधरी यांनी जिल्ह््््यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी व कृषी विभागाच्या अधिकाºयांच्या मागदर्शनात शेतकरी उत्पादक कंपन्यांची सुरु असलेली वाटचाल याबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी भंडारा येथीलशेतकरी देवानंद चौधरी, ठाणे जिल्ह्यातील जानकी बागले, औरंगाबाद जिल्ह्यातील दिपक चव्हाण या शेतकºयांशी संवाद साधला.कृषी आयुक्तांकडून भंडारा उपविभागाचे कौतुकजिल्हा हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जात असताना अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहे. मात्र आता पारंपारिक शेतकºयांचे अर्थकारण बदलण्यासाठी प्रयत्न सुरु झाला आहे. संपूर्ण विदर्भातून फक्त भंडारा जिल्ह्यातीलच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे उत्पादन ते थेट ग्राहक विक्रीसाठी भंडारा उपविभागातून पाच शेतकरी कंपन्यांचे प्रस्ताव आयुक्तालयात पाठवण्यात आले आहेत. आयुक्तालयाने दखल घेत राज्यस्तरीय बैठकीत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी भंडारा उपविभागाचे कौतुक केले आहे. उपविभाग भंडरा उपविभागा अंतर्गत शेतकरी कंपन्यांची बैठक बोलावत ५ शेतकरी कंपन्यांची निवड केली आहे. यात एका गावात एका वाणाची लागवड करुन ग्राहकांना थेट एकाच जातीचा तांदूळ टाटा कंपनीच्या सहकार्याने विक्री होणार आहे. कंपनीशी करार केल्याने बिग बझार व मॉलमध्ये भंडाराचा तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार आहे. यात दलालाकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक पूर्णपणे थांबणार आहे.स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत शेतकरी, शेतमजूरांना देखील प्रशिक्षीत केले जाणार आहे. ज्या नवोदीत तरुणांना,शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीव्यवसासाठीचे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आवाहन भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलींद लाड यांनी केले आहे.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीFarmerशेतकरी