सेंद्रीय शेतीला पूरक असलेली ‘ढेंच्या’ची शेती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:01 IST2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:01:38+5:30

यातील काही होतकरू व सुधारित शेतकरी खरीप हंगामाला हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी प्रामाणिकतेने प्रयत्न करतात. खरिपात पालांदूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात ढेंचा, सोनबोरू लावून जमिनीचे आरोग्य सुधारणेकडे विशेष लक्ष दिले आहे.

Dhenchya farming complements organic farming! | सेंद्रीय शेतीला पूरक असलेली ‘ढेंच्या’ची शेती!

सेंद्रीय शेतीला पूरक असलेली ‘ढेंच्या’ची शेती!

ठळक मुद्देजमिनीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीचे खत महत्त्वाचे : कमी खर्चात व्यवस्थित खताचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : जमिनीचे आरोग्य टिकविण्याकरिता शेणखता सोबतच सेंद्रीय खताची नितांत गरज आहे. जमिनीचा पोत कायम ठेवत उत्पन्न घेतल्यास जमिनीचे आरोग्य टिकून राहते. ढेंचा, सोनबोरु यासारखे हिरवळीच्या खतातील वनस्पती जमिनीचा पोत सुधारतात. अनियमित रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीचा पोत बिघडत चाललेला आहे. अमर्याद रासायनिक खताच्या वापरामुळे रोगराई वाढत उत्पन्न खर्च वाढलेला आहे. कृषी विभागामार्फत वारंवार शेतकऱ्यांना वर्षभर मार्गदर्शन करीत सेंद्रीय शेती, सेंद्रीय खते वापरण्याकडे लक्ष देण्याचे आव्हान केले जाते.
यातील काही होतकरू व सुधारित शेतकरी खरीप हंगामाला हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी प्रामाणिकतेने प्रयत्न करतात. खरिपात पालांदूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात ढेंचा, सोनबोरू लावून जमिनीचे आरोग्य सुधारणेकडे विशेष लक्ष दिले आहे.
ढेंचा अगदी पंचवीस ते तीस दिवसात सेंद्रीय खता करिता उपयुक्त ठरून वातावरणातील उपयुक्त घटक जमिनीत उपलब्ध करून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी मोठी मदत करतात. परिणामी हिरवळीचा खत मिळत आहे.

Web Title: Dhenchya farming complements organic farming!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती