धीरजकुमार नवे जिल्हाधिकारी तर झलके पोलीस अधीक्षक
By Admin | Updated: May 15, 2015 00:27 IST2015-05-15T00:27:46+5:302015-05-15T00:27:46+5:30
येथील जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांची नागपूर येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून पदोन्नतीवर बदली झाली आहे.

धीरजकुमार नवे जिल्हाधिकारी तर झलके पोलीस अधीक्षक
भंडारा : येथील जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांची नागपूर येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून पदोन्नतीवर बदली झाली आहे. त्यांच्याजागी नांदेडचे जिल्हाधिकारी धीरजकुमार हे भंडाऱ्याचे नवे जिल्हाधिकारी असतील.
डॉ. खोडे या भारतीय प्रशासन सेवेच्या २००७ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. दोन वर्षापूर्वी त्या भंडाऱ्यात रुजू झाल्या होत्या. धीरजकुमार हे भारतीय प्रशासन सेवेच्या २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
डॉ.माधवी खोडे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे कामकाज कुशलतेने हाताळले होते. कामे वेळेत करण्यावर त्यांनी भर दिला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांची हिंगोली येथे बदली झाली आहे. त्यांच्याजागी नागपूर रेल्वे पोलीस अधीक्षक दिलीप झलके हे नवे पोलीस अधीक्षक असतील. दीड वर्षातच कणसे यांचे स्थांनातरण झाले आहे.
दिलीप झलके हे वर्षभरापूर्वी गोंदिया येथे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची नागपूरला बदली झाली होती. अनेक वर्षांनंतर एकाचवेळी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांची बदली झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)