धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पात प्रतिबंध नाही

By Admin | Updated: June 28, 2014 23:26 IST2014-06-28T23:26:27+5:302014-06-28T23:26:27+5:30

गोंदिया जिल्ह्यातील अदानी विज प्रकल्प आणि धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदीवर बांधकाम करण्यात आलेल्या धरण बांधकाम परिसरात प्रतिबंधीत क्षेत्राचे

Dhapewada does not prevent the upturn irrigation project | धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पात प्रतिबंध नाही

धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पात प्रतिबंध नाही

पाच जणांना जलसमाधी : फलक, सुरक्षा गार्डचा अभाव
चुल्हाड (सिहोरा) : गोंदिया जिल्ह्यातील अदानी विज प्रकल्प आणि धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदीवर बांधकाम करण्यात आलेल्या धरण बांधकाम परिसरात प्रतिबंधीत क्षेत्राचे फलक तथा सुरक्षा गार्डचा अभाव आहे. परीणामी जलसमाधी घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
तिरोडा तालुक्यात अदानी वीज प्रकल्प आणि धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प हे दोन महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पांना पाणी पुरवठा करण्यासाठी सिहोरा परिसरातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर ४५० कोटी खर्चून धरण बांधकाम करण्यात आले आहे. अंदाजे दरवाजे असलेल्या या धरण बांधकामात पाणी अडविण्यास सुरूवात झाली आहे. या पाण्याचा विस्तार १८ कि़मी. अंतर पर्यंत नदी पात्रात आहे. या अंतरपर्यंत नदी काठावर गावाचे वास्तव्य आहेत. सिहोरा आणि तिरोडा या परिसरातील हे गावे आहेत. पाणी अडविण्यात आल्याने नदीचे पात्र धोक्याचे झाले आहे. बहुतांश नदी काठावरील गावांचे देवस्थान याच काठालगत आहेत. भक्त भाविक तथा यात्राचे नियोजन सदैव देवस्थान परिसरात आहेत. नदी पात्रात पाणीच पाणी असताना धोक्याचे पात्र तथा पोहण्यास प्रतिबंध घालणारे फलक नाहीत. या गावालगत प्रवास आणि वाहतुकी करीता नदी पात्रात डोंग्याचा उपयोग नागरिक करीत आहेत. परंतु हे डोंगे जीर्ण झाली आहेत. नियंत्रण भंडारा जिल्हा प्रशासनाचे असले तरी गोंदिया जिल्हा प्रशासन डोंगा घाट लिलावात काढत आहे. पावसाडा सुरू झाला असून वैनगंगा नदीवर बांधकाम करण्यात आलेल्या धरणाचे दरवाजे उघडण्यात येत आहेत. यामुळे नदीपात्रात पाण्याच्या पातळीत चढ उतार होत आहेत. यामुळे डोंग्यातून प्रवास धोक्याचे झाले आहे. सुसज्ज डोंगे तथा नियंत्रण ठेवणाऱ्या उपाय योजनासाठी दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची तातडीची बैठक होणे अत्यावश्यक आहे. नियोजन, कृतिआराखडा तथा कागदोपत्री निर्देशाने नारिकांचे जिवघेणे प्रश्न सुटणार नाहीत, असा प्रतिक्रिया गावकरी देत आहेत. सरंपच, पोलीस पाटीलांचे भ्रमणध्वनी क्रमांक तालुका प्रशासन तथा पोलीस प्रशासनाकडे आहेत. परंतु रात्री हे भ्रमणध्वनी नो कव्हरेजमध्ये सांगत आहेत. यामुळे नवे संकट निर्माण होणार आहेत. दरम्यान प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्यासाठी कवलेवाडा मांडवी गावानजीक धरणाचे बांधकाम झाले आहे. पिपरी चुन्ही गाव हाकेच्या अंतरावर आहे. कुणी या गावचे पुनर्वसनाचे बोलत नाही. धरणाचे पाणी गावात थेट शिरत असतानाही सारेच आंधळे आणि बहीरे झाल्याची प्रचिती येत आहे. धरणात पाणी अडविण्यात आल्याने ग्रिन व्हॅली पर्यटन स्थळाची जागा आता या धरणाने घेतली आहे. भाविक तथा पर्यटक मोठ्या संख्येने या धरणाला भेट देत आहेत. धरणातील साठवणूक करण्यात आलेले पाणी धोकादायक आहे. या धरण परिसरात पोहण्याचा आनंद घेताना पाच जणांना जलसमाधी मिळाली आहे. दरम्यान मांडवी गावाच्या दिशेने असलेल्या पात्रात पाच जणांचा बळी गेला असल्याने प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याची ओरड आहे. (वार्ताहर)

Web Title: Dhapewada does not prevent the upturn irrigation project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.