धनगर समाजाची विजयी मिरवणूक
By Admin | Updated: June 6, 2016 00:36 IST2016-06-06T00:36:11+5:302016-06-06T00:36:11+5:30
धनगर समाज संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल...

धनगर समाजाची विजयी मिरवणूक
मोटारसायकल रॅली : विकास महात्मे यांची राज्यसभेवर निवड
भंडारा : धनगर समाज संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल भंडारा शहरामध्ये भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
भंडारा शहरातील पंडीतराव पांडे यांचे येथील पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करून विजयी रॅलीला प्रारंभ करण्यात आला.
ही रॅली गांधी चौक ते जिल्हा परिषद मार्गे राजीव गांधी चौकातून पुन्हा अहिल्या मंदिरात आली. यावेळी रॅलीचे सभेत रुपांतर झाले.
सभेला धनगर समाज संघर्ष समिती भंडाराचे अध्यक्ष राजकुमार मरठे, उपाध्यक्ष प्रकाश हातेल, सचिव प्रा.शंकर गायकी, इंजि. सुरेश पुनसे, पंडीतराव पांडे, वर्षाव अहिर, प्रेमलाल अहिर, सोनू हातेल, प्रमोद फोपसे, प्रकाश पडोळे, सुनिल मुकुर्णे, मुनीश्वर मोरे, नानेश्वर मोरे, खाडे, तालन, कवाने, संजय पाटील, सोहम पाटील, प्रदीप पोराटे, राजकुमार मोरे, जयशंकर घटारे, अनिल मोरे, संदिप पेटे, दिनेश मरळे, दसाराम खऊळ, लोमेश हातेल, मुकुर्णे, पडोळे, पाटील आदी उपस्थित होते.
संचालन व आभार नरेश पडोळे यांनी मानले.
(प्रतिनिधी)