धम्म बोलण्यापेक्षा आचरणात आणावा
By Admin | Updated: October 7, 2014 23:30 IST2014-10-07T23:30:27+5:302014-10-07T23:30:27+5:30
धम्मचक्रपवर्तनानेच परिवर्तनाची क्रांती जन्मास आली. अन्यायावर मात करण्याची उर्जा प्राप्त झाली. माणसाच्या प्रत्यक्ष जगण्याला अर्थ प्राप्त झाला. स्वत: बुद्ध अनुयायी होणे म्हणजे समता, सहिष्णुता,

धम्म बोलण्यापेक्षा आचरणात आणावा
भंडारा : धम्मचक्रपवर्तनानेच परिवर्तनाची क्रांती जन्मास आली. अन्यायावर मात करण्याची उर्जा प्राप्त झाली. माणसाच्या प्रत्यक्ष जगण्याला अर्थ प्राप्त झाला. स्वत: बुद्ध अनुयायी होणे म्हणजे समता, सहिष्णुता, विवेकानिष्ठ वैज्ञानिक जाणीव आणि अनिश्वरवाद व अनात्मवाद याचा पुरस्कार करणे होय.
तथागताच्या शिकवणीनेच माणसाचे मन प्रकाशित होते. उन्नत होते. प्रज्ञा, करूणा, मैत्री आणि शील या मानवी मूल्याच्या आविस्काराने मानवतेची स्थापना होते. धम्म हा बोलण्यात नसून आचारणात आहे. धम्माच्या नैतिक सदाचारातूनच सामाजिक जीवन निकोप व मैत्रीपूर्ण होईल, असे प्रतिपादन हर्षल मेश्राम यांनी केले. अशोक विजयादशमी निमित्त ५८ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मधुकर रंगारी यांनी विचार व्यक्त करताना माणसाच्या बोलण्यात आणि वागण्यात दुटप्पीपणा नसावा. सकाळी बौद्ध आणि संध्याकाळी देविमायचा भक्त ही स्थिती दुभंगलेली मनोरूग्णता दर्शविते, म्हणून एकीने आणि नेकीने बुद्धाच्या शिकवणीचे आचरण करावे, असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित असलेले अमृत शहारे, निवृत्त कार्यकारी अभियंता, कुंदा भोवते, इंजि. प्रभाकर भोयर, वसंतराव हुमणे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरूवात सामूहिक बुद्ध वंदनेने झाली. कार्यक्रमाच्या शेवटी पंचशील महिला मंडळ पटेलपुरा वॉर्ड भंडारा यांच्यातर्फे अल्पोपहार देण्यात आला. आभार महेंद्र वाहाणे यांनी मानले. कार्यक्रमाकरीता प्रा. रमेश जांगळे, ताराचंद नंदागवळी, शामल भादुडी, वामन मेश्राम, अॅड. डी.के. वानखेडे, यशवंत नंदेश्वर, असित बागडे, निर्मला गोस्वामी, मदन बागडे, महेंद्र वाहाणे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)