धम्म पंचशिलाचे पालन करणे गरजेचे
By Admin | Updated: February 8, 2015 23:30 IST2015-02-08T23:30:39+5:302015-02-08T23:30:39+5:30
जवाहरनगर : धम्म म्हणजे काय, जसा समजून घेतला तसा दुसऱ्यांनाही समजाविला पाहिजे. नकारात्मक विचार दूर सारून पंचशील तत्वाचे पालन सर्व समाज बांधवांनी करणे गरजेचे आहे,

धम्म पंचशिलाचे पालन करणे गरजेचे
हत्तीडोह येथे बौध्द धम्म मेळावा
जवाहरनगर : धम्म म्हणजे काय, जसा समजून घेतला तसा दुसऱ्यांनाही समजाविला पाहिजे. नकारात्मक विचार दूर सारून पंचशील तत्वाचे पालन सर्व समाज बांधवांनी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भदन्त संघरत्न यांनी केले.
ऐतिहासिक दशबल पहाडी हत्तीडोई बौद्ध पर्यटन स्थळ येथे दशबल पहाडी भिक्षु संघ द्वारा माघ पौर्णिमा वर्धापन दिनानिमित्त आयोजित बौद्ध धम्म मेळाव्याप्रसंगी भदंत संघरत्न बोलत होते. अध्यक्षस्थानी भदंत डॉ. धम्मदीप हे होते.
यावेळी भदन्त धम्मपाल, भदंत संघप्रिय, भदंत धम्मज्योती, भदंत शिलानंद, भदंत शिलधन महास्तवीर, भिक्षु संघाचे अध्यक्ष विमल बोधी, वसंत हुमणे, अमृत बन्सोड, शशीकांत भोयर, महादेव मेश्राम, प्रियकला मेश्राम, रमेश जांगळे, मदनपाल गोस्वामी, राजू वाहने आदी उपस्थित होते.
या बौद्ध पर्यटनस्थळाचे पावित्र्य टिकवून ठेवणे काळाची गरज आहे. आपला संघर्ष कुणासोबत आहे हे जाणून समजून घेतले पाहिजे. जीवन हे क्रांतीकारी संघर्षाचे आहे.
इतिहासाची जपणूक करून वर्तमानासाठी आदर्श निर्माण करावे, असे अमृत बन्सोड यांनी प्रतिपादन केले. डॉ. धम्मदिप म्हणाले, सर्वांनी शिक्षित झाले पाहिजे. जो आपल्यावर अन्याय व अत्याचार करतो त्यांच्याविरुद्ध संघटीत होऊन शांततेच्या मार्गाने न्यायपूर्व निर्णयासाठी संघर्ष करावे. तत्पूर्वी सकाळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भिक्षु धम्मज्योती यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर त्रिरत्न बुद्ध वंदना घेण्यात आली. याप्रसंगी विविध गावाहून बौद्ध जनतेची बौद्ध पर्यटन स्थळी एकच गर्दी जमली होती. बौद्ध उपासक व उपासिकाद्वारे भिक्षु संघाला भोजनदान देण्यात आले. प्रास्ताविक भिक्षुणी संघप्रिया यांनी केले. संचालन भिक्षु धम्मज्योती यांनी केले. आभार मदनपाल गोस्वामी यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.(वार्ताहर)