भाविकांनी फुलणार उत्तरवाहिनी

By Admin | Updated: January 14, 2015 23:03 IST2015-01-14T23:03:00+5:302015-01-14T23:03:00+5:30

पुरातन काळापासून लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव, मांढळ येथील चुलबंद नदीतिरावर भरणाऱ्या यात्रेनिमित्त हजारो भाविक गंगास्रानाचा लाभ घेणार आहेत. यात्रेनिमित्त येथे भागवत सप्ताहात

The devotees will flower in the north | भाविकांनी फुलणार उत्तरवाहिनी

भाविकांनी फुलणार उत्तरवाहिनी

मांढळ येथे आज यात्रा : गंगा स्रानाला विशेष महत्व
विरली (बु.) : पुरातन काळापासून लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव, मांढळ येथील चुलबंद नदीतिरावर भरणाऱ्या यात्रेनिमित्त हजारो भाविक गंगास्रानाचा लाभ घेणार आहेत. यात्रेनिमित्त येथे भागवत सप्ताहात गोपालकाला आणि विविध मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
पूर्व विदर्भाची काशी आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे उत्तरवाहिनी तिर्थक्षेत्र मकरसंक्रांतीला भाविकांच्या अलोट गर्दीने फुलून दिसणार आहे. यावेळी हजारो भाविक पवित्र गंगास्थानाचा लाभ घेवून आपल्या मित्रपरिवारासह फराळाचा आस्वाद घेतात.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंगलभूमीत मागील ५० वर्षांपासून गुरूदेव सेवा मंडळाचे शेकडो अनुयायी ग्रामगीतेवर प्रवचन करून माझे गावच नाही का तिर्थ याची महती श्रोत्यांना पटवून देत आहेत.
या तिर्थस्थळी चुलबंद नदी उत्तरेकडून वळसा घालून पुन्हा दक्षिणेकडे वाहत असल्याने या तिर्थस्थळाला उत्तरवाहिनी असे नाव पडले आहे. नावाप्रमाणेच येथे वाहिणीचा संथ वेग आणि आजू बाजूच्या वनराईचा सुगंधी गंध आहे. या ठिकाणी भगवान शंकराचे प्राचीन देवालय आहे.
येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे मन नैसर्गिक तंद्रीत रमून जाते. त्यामुळेच या निर्जन स्थळी हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी योगसाधना केल्याची साक्ष येथील मोठमोठे कुंड देतात. शेकडो वर्षांपासून या ठिकाणी मकरसंक्रांतीला भव्य यात्रा भरत असते. भाविक गुळपोहे, मुरमुऱ्याचे लाडू, तिळगुळ व चिवड्याचे फराळ करून नदीपात्रातील मऊ रेताळ गालिच्यांचा मनसोक्त आस्वाद घेतात. दुरवरून येणारे भाविक येथे मोठ्या श्रद्धेने मुंडण करवून घेतात. या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी सभा मंडप बांधण्यात आले आहे.
दांडेगाव आणि मांढळ या दोन्ही गावांच्या सहकार्यातून येथे दरवर्षी भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते. मकरसंक्रांतीच्या शुभपर्वावर एक दिवसीय यात्रेचे आयोजन केले जाते. येथील भागवत सप्ताहाचे हे ५१ वे वर्ष असून ९ जानेवारीपासून हभप रतनलालजी महाराज गुजरातवाले हे भागवतावर प्रवचने देवून भाविकांना मंत्रमुग्ध करीत आहेत. गेले सात दिवस दररोज सामुदायिक प्रार्थना आणि भजन, किर्तन आदी कार्यक्रमांमुळे येथे भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. मकरसंक्रांतील गोपालकाल्याने या भागवत सप्ताहाचा समारोप होईल. यात्रेनिमित्त येथे भाविकांची गर्दी उसळते. पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. या यात्रेत सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमामून कार्यक्रम सुरळीत पार पाडल्या जातात. (वार्ताहर)

Web Title: The devotees will flower in the north

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.