भजन स्पर्धेत भक्तीमय झाल्या सखी

By Admin | Updated: July 21, 2015 00:40 IST2015-07-21T00:40:25+5:302015-07-21T00:40:25+5:30

सखी मंचतर्फे येथील श्यामसुंदर सेलिब्रेशन हॉलमध्ये कृष्ण भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Devotees become devoted to bhajan competition | भजन स्पर्धेत भक्तीमय झाल्या सखी

भजन स्पर्धेत भक्तीमय झाल्या सखी

विजेत्यांचा गौरव : विविध गटातील विजेत्यांचा समावेश
ंतुमसर : सखी मंचतर्फे येथील श्यामसुंदर सेलिब्रेशन हॉलमध्ये कृष्ण भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सहयोग भजन मंडळाने प्रथम क्रमांक मिळवत सर्वांची वाहवाह मिळविली. तालुक्यातील स्पर्धक व सखी कृष्ण भजनाने भक्तिमय झाल्या विजयी स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात एकल व समुह भजन स्पर्धा घेण्यात आली. त्यात सहयोग भजन मंडळ, द्वितीय सिहोरा भजन मंडळ तर शारदा भजन मंडळाला तृतीय क्रमांकासाठी निवडण्यात आले तसेच एकल गायन स्पर्धेत अंकिता शर्मा प्रथम, रागिनी सेलोकर द्वितीय व तृतीय क्रमांक नुरी आगाशे हिने पटकाविले. स्पर्धेचे परिक्षण वनिता बारस्कर व अवंतिका शर्मा यांनी केले. संचालन तालुका विभाग प्रतिनिधी रितु पशिने तर आभार विभाग प्रतिनिधी दुर्गा भुरे यांनी मानले. सुमन अडकने, गुणवंती बोरकर, छाया सेलोकर, दुर्गा गायधने, पारबता मोहतुरे, मालन चोले, प्रीती बांगरे व स्मिता हेडाऊ यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)

Web Title: Devotees become devoted to bhajan competition