३९ कोटी २८ लाख रूपयांची विकास कामे
By Admin | Updated: April 19, 2016 00:34 IST2016-04-19T00:34:36+5:302016-04-19T00:34:36+5:30
आमदार बाळा काशीवार यांच्या प्रयत्नाने अर्थसंकल्प बजेट अंतर्गत साकोली विधानसभा क्षेत्रातील साकोली लाखनी व लाखांदूर या तिन्ही तालुक्यांतर्गत ....

३९ कोटी २८ लाख रूपयांची विकास कामे
मिळणार लाभ : साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्याचा समावेश
साकोली : आमदार बाळा काशीवार यांच्या प्रयत्नाने अर्थसंकल्प बजेट अंतर्गत साकोली विधानसभा क्षेत्रातील साकोली लाखनी व लाखांदूर या तिन्ही तालुक्यांतर्गत ३१ कोटी व २८ लक्ष रूपये निधी रस्ते विकास कामावर मंजुरी मिळाली आहे. ही कामे लवकरच सुरू होणार आहेत, अशीही माहिती मिळाली आहे.
या रस्ते विकास कामामध्ये लाखांदूर चुलबंद नदीवर चिचोली ते भागडी रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम १० कोटी सीआरएफ. लाखांदूर बोधली ते नवी बोधली मोठ्या पुलाचे बांधकाम १० कोटी सीआरएफ.
लाखांदूर किटाडी विरली रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम १ कोटी १४ लक्ष, लाखनी मानेगाव ते पोहरा रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी १० लक्ष, लाखनी विरली ते किटाडी रस्त्याची सुधारणा करणे ६० लाख रूपये, लाखनी पेंढरी ते पुरकाबोडी रस्त्याची सुधारणा करणे १ कोटी ५० लाख, लाखनी आदिवासी विकास विभाग जांभ, आंधळगाव, मुंढरी, खडकी, खेडेपार, लाखनी, पेंढरी, पालांदूर, रा.मा. ३५८ रस्ता रा.मा. ३६१ चंद्रपूर ते चिखलाबोडी लांबी रस्ता २ कि.मी. पुल व मोऱ्याचे बांधकाम ६४ लक्ष रूपये, साकोली एकोडी जांभळी कोसमतोडी रस्त्याची सुधारणा करणे ५० लक्ष, साकोली, वडेगाव, मालुटोला, रेंगेपार, सातलवाडा, रोड रस्त्याची सुधारणा करणे ९० लक्ष रूपये साकोली खैरी पिंडकेपार, जमनापुर, सेंदुरवाफा, रस्त्याची सुधारणा करणे ९० लाख साकोली सिंचन विभाग चुलबंद प्रकल्प २० कोटी रूपये, साकोली सिंचन विभाग भिमलकसा १ कोटी अशी एकूण ३१ कोटी २८ लक्ष रूपयाची कामे आ. बाळा काशीवार यांच्या प्रयत्नाने मंजुर झाली आहेत. (तालुका प्रतिनिधी)