गावांसोबत शहराचाही विकास महत्त्वाचा
By Admin | Updated: October 11, 2014 01:18 IST2014-10-11T01:18:53+5:302014-10-11T01:18:53+5:30
ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणे व जनतेची कामे गावातच होण्याच्या अनुषंगाने गावाचा विकास .....

गावांसोबत शहराचाही विकास महत्त्वाचा
भंडारा : ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणे व जनतेची कामे गावातच होण्याच्या अनुषंगाने गावाचा विकास करणे यासोबतच वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचा प्राधान्याने विकास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.
भंडारा शहरातील पोस्ट आॅफीस चौक, गांधी चौक, डॉ. हेडगेवार चौक, सहकारनगर आदी शहरात विविध ठिकाणी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सुविधांअभावी व रोजगारांच्या संधीअभावी गावांमधून शहरामध्ये स्थालांतरण होत आहे. गावांमध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त झाले तर स्थालांतरण थांबेल. नगर पालिका प्रशासन यासाठी प्रयत्न करीत असले तरी राज्य सरकारकडून भरीव निधी मिळाल्याशिवाय शहराचा चेहरामोहरा बदलणे अशक्य आहे. या शहराचा नागरिक या नात्याने मागील पाच वर्षात शहराच्या विकासासाठी निधी खेचून आणण्याचा प्रयत्न केला. ऐतिहासिक वारसा असलेल्या गोसावी समाधींना राष्ट्रीय स्मारक घोषित करुन त्यासाठी पुरातत्व विभागाकडून निधी खेचून आणला. शहराची शान असलेल्या भंडारा शहरातील पांडे महलाची विक्री करुन तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचे षड्यंत्र हाणून पाडले. बेला ते सिर्सी हा बयापास मंजूर करवून घेतला आहे.
भंडारा व पवनी शहराचा चेहरा मोहरा बदलून एक आदर्श करण्यासाठी संपूर्ण आराखडा तयार करण्यात आल्याचेही भोंडेकर यांनी सांगितले. भंडारा शहरात दौरा करण्यापूर्वी त्यांनी खमारी, आमगांव, कोका, जवाहरनगर आदी गावांचा दौरा केला. या दौऱ्यात तालुकाप्रमुख हेंमत बांडेबुचे, युवासेना संघटक बबलू आतीलकर, विद्यार्थी सेनाप्रमुख मुकेश थोटे, मंगला कोल्हे, अनिल गायधने, आशा गायधने, डॉ. अश्विनी भोंडेकर आदी पदाधिकारी होते. (प्रतिनिधी)