क्रीडा शिबिरामुळे बालकांच्या बुद्धीचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2016 00:35 IST2016-05-18T00:35:48+5:302016-05-18T00:35:48+5:30

जर बालकाच्या बुद्धीचा विकास करावयाचा असेल तर त्याच्या शरीराचा अगोदर विकास होणे आवश्यक आहे.

Development of children's brain due to sports camp | क्रीडा शिबिरामुळे बालकांच्या बुद्धीचा विकास

क्रीडा शिबिरामुळे बालकांच्या बुद्धीचा विकास

साकोली : जर बालकाच्या बुद्धीचा विकास करावयाचा असेल तर त्याच्या शरीराचा अगोदर विकास होणे आवश्यक आहे. जर मुले निरोगी आणि आरोग्यदायी असतील तर त्यांचे मन लिहिण्या वाचण्यामध्ये योग्य प्रकारे लागेल. म्हणून सुदृढ शरीरामध्येच तल्लख बुद्धी वास करते व अशा क्रीडा शिबिरांमुळे बालकांच्या बुद्धीचा विकास निश्चितच होतो असे प्रतिपादन गोकुळ राऊत पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे साकोली यांनी जिल्हा क्रीडा कार्यालय भंडारा व तालुका क्रीडा संकुल साकोली तर्फे आयोजित ग्रीष्मकालीन क्रीडा शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राजेशसिंह बैस तालुका होमगार्ड समादेशक शाहिद कुरैशी, गुणवंत क्रीडासंघटक, अरविंद पुस्तोडे मास्टर ट्रेनर, तुषार मेश्राम तालुका संयोजक यांच्या उपस्थितीत पार पडला.
राजेश बैस यांनी सांगितले की, आजच्या कठीण जगामध्ये जगण्यासाठी हिमालयासारखी दृढता आणि परिस्थितीतला तोंड देण्यासाठी लोखंडाचे बळ आपल्यामध्ये असायला पाहिजे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शरीर आरोग्य संपन्न असेल. क्रीडा संघटक कुरैशी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या ताणतणाव दूर करण्यासाठी अशा शिबिराची आवश्यकता आहे. शहरांमध्ये अमाप फी घेवून पालकांची लुबाडणूक केली जाते.
ग्रामीण भागात क्रीडा शिबिरांचे आयोजन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मेजवाणीच असते. कावळे भरत यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले की, जवळपास १३५ विद्यार्थी सहभागी होते.
शिबिरात कराटे, व्हॉलीबॉल, योगा, धनिर्विद्या, फुटबॉल, लंगडी, लगोरी, कटकवार विद्यालयात टेबलटेनिस, बास्केटबॉलचे मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी काजल भेंडारकर, आकांक्षा चव्हाण, छायांशू शिवणकर या शिबिरार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
क्रीडा प्रशिक्षक भरत कावळे, बी.के. दोनोडे, डी.एम. मानकर, एम.डी. घोरमारे, राजेश कापगते, उमेश चोले, पाखमोडे यांनी सहकार्य केले. संचालन बाळकृष्ण दोनोडे तर आभार एम.डी. घोरमारे यांनी मानले. शिबिर यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप इटणकर तालुका क्रीडा अधिकारी ए.बी. मरसकोल्हे यांनी सर्वांचे कौतूक केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Development of children's brain due to sports camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.