शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

भरपूर पाऊस होऊनही अप्पर वर्धा केवळ ५० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 05:00 IST

सध्या अमरावती जिल्ह्यात ४५ ते ४६ सेल्सिअस तापमान असून, पुढे उन्हाळ्यातील तापमान अधिक वाढल्यास पाण्याच्या पातळीत आणखी मोठी घट होण्याची शक्यता  नाकारता येत नाही. सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातून जिल्ह्यातील विविध परिसरात तसेच अमरावती शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व एमआयडीसी येथेसुद्धा पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वर्धा धरणात मुबलक पाणीसाठा जमा होत असल्यामुळे अमरावतीकरांना बाराही महिने पाणीटंचाई भासत नाही.

अजय पाटीललोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गणल्या जाणाऱ्या व मोर्शीसह अमरावती शहराची तहान भागवणाऱ्या सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी  कडक उन्हाळ्याच्या दिवसात अप्पर वर्धा धरणाच्या पाण्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे पातळीत कमालीची घट होत असून यावर्षी सुद्धा पाण्याचा जलसाठा अर्ध्यावरच येऊन ठेपला आहे. सध्या सिंभोरा जलाशयात  केवळ ५०.५१ टक्के पाण्याचा साठा उपलब्ध आहे. सध्या अमरावती जिल्ह्यात ४५ ते ४६ सेल्सिअस तापमान असून, पुढे उन्हाळ्यातील तापमान अधिक वाढल्यास पाण्याच्या पातळीत आणखी मोठी घट होण्याची शक्यता  नाकारता येत नाही. सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातून जिल्ह्यातील विविध परिसरात तसेच अमरावती शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व एमआयडीसी येथेसुद्धा पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वर्धा धरणात मुबलक पाणीसाठा जमा होत असल्यामुळे अमरावतीकरांना बाराही महिने पाणीटंचाई भासत नाही. या धरणातून शेतीसह औद्योगिक क्षेत्रात सुद्धा पाणी पुरवठा केला जातो. 

- जानेवारी महिन्यात सिंभोरा धरणातील पाण्याची पातळी ३४१.२७ दशलक्ष घनमीटर होती व उपयुक्त जलसाठा ४५७.४९ दलघमी म्हणजे ८१ टक्के जलसाठा होता. परंतु जानेवारी ते एप्रिलपर्यंत या चार महिन्यांच्या कालावधीत हा जलसाठा जवळपास ३० टक्क्यांनी घटला.

- सध्या धरणातील जलसाठा ३३८.८६ मीटर असून उपयुक्त साठा २८९.३२ दलघमी आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अप्पर वर्धा धरणात केवळ ५०.५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. 

- गेल्या चार महिन्यांत या धरणातून नॉन एरीकेशनकरिता २८.१४३ दलघमी पाणी सोडण्यात आले. गेल्या तीन महिन्यात शहरवासीयांना १३.६७२ दलघमी पाण्याचा पुरवठा करण्यात आला. 

- सिंचनाकरिता ११३.५४ एमआयडीसीला ०.६११ आणि रतन इंडिया कंपनीला ६.३४८ दलघमी पाणी पुरविण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण