नियुक्ती लेंडेझरीत प्रतिनियुक्ती भंडार्‍यात

By Admin | Updated: June 7, 2014 23:47 IST2014-06-07T23:47:32+5:302014-06-07T23:47:32+5:30

आदिवासी गावात आरोग्य सेवा पुरविण्याचा दावा राज्य शासन जरी करीत असले तरी ते केवळ कागदोपत्रीच दिसत आहे. तुमसर तालुक्यातील लेंडेझरी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती असलेल्या एका डॉक्टर्सची

Deputation in Dept. | नियुक्ती लेंडेझरीत प्रतिनियुक्ती भंडार्‍यात

नियुक्ती लेंडेझरीत प्रतिनियुक्ती भंडार्‍यात

सेवा कोलमडली : आदिवासीबहुल गावातील आरोग्य सेवेवर प्रश्नचिन्ह
तुमसर : आदिवासी गावात आरोग्य सेवा पुरविण्याचा दावा राज्य शासन जरी करीत असले तरी ते केवळ कागदोपत्रीच दिसत आहे. तुमसर तालुक्यातील लेंडेझरी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती असलेल्या एका डॉक्टर्सची सेवा भंडार्‍यात सुरु आहे. वेतन लेंडेझरीतून व कर्तव्य मात्र भंडार्‍यात असाच प्रकार मागील दोन वर्षापासून सुरु आहे. या पळवाटा तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. या आरोग्य केंद्राला चार दिवसापूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी भेट दिली होती हे विशेष.
तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल लेंडेझरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. येथे रुग्णांना २४ तास सेवा पुरविण्याचा दावा जिल्हा परिषद करते. जिल्हा परिषदेच्या प्रत्यक्ष नियंत्रणात हे प्राथमिक आरोग्य केंद्र येते. दोन वर्षापूर्वी येथे डॉ.लुंगे यांचे स्थानांतरण झाले आहे. सध्या ते भंडारा येथे प्रतिनियुक्तीवर आहेत. पूर्वी ते तुमसर येथे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. लेंडेझरी येथे कागदावर कार्यरत असून प्रत्यक्ष कर्तव्य मात्र भंडार्‍यात सुरु आहे. आरोग्य विभागाचे येथे ताळमेळ दिसत नाही. डॉ.लुंगे यांची सेवा भंडार ायेथे गरजेची आहे तर नियमानुसार त्यांचे स्थानांतरण करण्याची गरज होती. आदिवासी बहुल लेंडेझरी येथे आदिवासी बांधवांना सेवा देण्याचे सोंग करण्याची गरजच नाही. या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर्सची नियुक्ती जिल्हा परिषदेने केली आहे. सध्या येथे एकच नियमीत डॉक्टर नचिकेत पातुरकर कार्यरत आहेत. लेंडेझरी जवळील सुमारे ३0 ते ३२ गावे या प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडली आहेत. येथे रुग्णांना भरती सुद्धा करण्यात येते. २४ तास सेवा देण्याचा दावा या प्रतिनियुक्तीमुळे फोल ठरल्याचे दिसते. यासंदर्भात आरोग्य विभाग बोलण्यास तयार नाही. डॉ.लुंगे नागपूर येथून ये-जा करतात. त्यांना सोयीचे ठरावे याकरिता प्रतिनियुक्ती दिली नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चिखली येथे आरोग्य उपकेंद्र आहे. येथे सात वर्षापासून मलेरिया तंत्रज्ञाचे पद रिक्त आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना तक्रार केल्यावरही ते पद अजूनपर्यंत भरण्यात आले नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Deputation in Dept.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.