घरकूल लाभापासून वंचित
By Admin | Updated: June 13, 2015 00:40 IST2015-06-13T00:40:14+5:302015-06-13T00:40:14+5:30
अपंग व्यक्तींना इंदिरा आवास योजनेतून घरकुलाचा लाभ देण्यात यावा असे केंद्र शासनाचे स्पष्ट निर्देश असतांनाही ...

घरकूल लाभापासून वंचित
व्यथा अपंग लाभार्थ्यांची : सूचनेचाही अभाव
तुमसर : अपंग व्यक्तींना इंदिरा आवास योजनेतून घरकुलाचा लाभ देण्यात यावा असे केंद्र शासनाचे स्पष्ट निर्देश असतांनाही आदेशाला बगल देत अपंगाना घरकूल योजनेचा लाभ देण्यापासून वंचित ठेवल्या जात आहे.
दारिद्रय रेषेखालील नागरिकांना हक्काचे घरकूल देणाऱ्या इंदिरा आवास योजनेअंतर्गत मानसिक व शारिरीक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीला घरकूल देण्यासंदर्भात केदं्र शासनाचे स्पष्ट दिशानिर्देश असतानाही प्रत्यक्षात मात्र अपंगाना इंदिरा आवास योजनेत डावलल्या गेल्याचे धक्कादायक वास्तव सामोर आले आहे.
याबाबद आता राज्य शासनाने नविन आदेश काढून इंदिरा आवास योजनेअंतर्गत वंचित अपंगाची प्रतिक्षा यादी तयार करुन त्यांना घरकूल देण्याची मागणी येथील अंपग बांधवांनी केली आहे. इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून अपंगाना घरकूल लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाने काही दिशा निर्देश दिले आहेत. यात अपंग शारीरिक किंवा मानसिक हा कमित कमी चाळीस टक्यापेक्षा कमी नसावा असा अपंगाना प्राधान्य देण्याच्या सुचना केंद्रशासनाच्या आहेत. मात्र याबाबत राज्य शासन व प्रशासन गंभिर नाही. त्यामुळे या योजनेअंतर्गत पात्र अपंग लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेचा लाभ मिळत नाही. केंद्र शासनाने सदर योजना कार्यान्वित करण्यासाठी जे दिशा निर्देश दिले आहेत. त्यामध्ये विधवा, परिपक्त्या तथा कठिण परिस्थितीत जीवन जगणाऱ्या महिला चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व असणारे मानसिक, शारीरिक अपंग तसेच सशस्त्र कारवाईत जीव गमाविलेल्या सैनिक व पोलिसांना इंदिरा आवास योजनेत घरकुल देताना प्राधान्य देण्याची सूचना देण्यात आली आहे. जिल्हयात व तालुक्यात अपंग व्यक्तींना या योजनेचा लाभ देण्यात प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या आदेशात अपंगाना घरकुल देण्याबाबतची सुचना देण्यात आली नाही. त्यामुळे केंद्राचे आदेश असतांनाही अधिकाऱ्याचा अज्ञानामुळे व हलगर्जीपणामुळे अपंगाना घरकुलपासून वंचित राहावे लागत आहे या महागाईच्या काळात चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंगाना घरकुल बांधणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे. बऱ्याच प्रमाणात अपंगांना निवारा नसल्याने उघड्यावरच जिवन जगत असल्याचे विदारक चित्र आहे. मात्र राज्य शासनाच्या तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या आदेशात अपंगाना घरकुल देण्याबाबत आदेश नसल्याने अपंगाना घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे. नविन अध्यादेश काढून इंदिरा आवास योजनेत अपंगाकरिता घरकूल मिळवून दयावे अशी मागणी अपंग संघटनेनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)