स्वस्त धान्यापासून जनता वंचित
By Admin | Updated: November 3, 2014 23:21 IST2014-11-03T23:21:57+5:302014-11-03T23:21:57+5:30
गरीब कुटुंबांना अल्प दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजनेअंतर्गत स्वच्छ धान्य दुकानातून धान्याचा वाटप केला जातो. मात्र स्वस्त धान्य दुकानदाराच्या

स्वस्त धान्यापासून जनता वंचित
पालोरा (चौ.) : गरीब कुटुंबांना अल्प दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजनेअंतर्गत स्वच्छ धान्य दुकानातून धान्याचा वाटप केला जातो. मात्र स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमर्जी कारभाराने गरीब जनतेला धान्यापासून वंचित राहावे लागते. अंत्योदय कार्ड धारकांना २ रु. किलो १० कि. गहू तर ३ रु. प्रमाणे २५ किलो तांदळाचे वाटप करायला पाहिजे. मात्र ३० किलो धान्याचा वाटप केल्या जात आहे. यातही मोजताना घट करून दिल्या जात आहे. अनेक दुकानातून उचललेल्या धान्याची पावती दिल्य ाजात नाही. दुकान सुरु बंद करण्याचे वेळापत्रक नाही.
महिन्याच्या शेवटीला दोन दिवस वाटप करून अन्नधान्य संपले म्हणून घोषित केल्या जाते. अनेकांचे शिधापत्रिका गहाळ झाल्या आहेत. तर अनेकांच्या शिधापत्रिका जीर्ण झाल्या आहेत. त्यांना धान्य दिल्या जात नाही. मात्र धान्याची उचल केली जात आहे. भर दिवसा गाड्या बोलावून धान्य भरून विक्रीकरिता काळ्या बाजारात विक्रीकरिता नेले जाते.
प्रत्येक गावात स्वस्त धान्य दुकानावर वचक ठेवण्यासाठी दक्षता समितीची निवड करण्यात आली आहे. मात्र गावात कुणीही याकडे लक्ष देत नाही. या समित्या फक्त कागदोपत्री उरल्या आहेत.
मागील दोन वर्षात पालोरा परिसरात अनेक स्वस्त धान्य दुकानदाराच्या घरी धाडी पाडल्या होत्या. मात्र कारवाई शून्य होत असल्यामुळे कुणीही पुढाकार ठेण्यास तयार होत नाही.
गरीब, गरजू, भूमिहीन कुटुंबांना जीवन जगण्यासाठी स्वस्त धान्याचा आधार दिला जातो. मात्र पुरवठा विभागाच्या दुर्लक्षाने गरीब जनतेला धान्यपासून वंचित राहावे लागते. रॉकेलचीही हिच स्थिती आहे. अंत्यसंस्कारालाही रॉकेल मिळत नाही. पुरवठा विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)