कामगार योजनेच्या लाभापासून वंचित
By Admin | Updated: February 23, 2017 00:28 IST2017-02-23T00:28:33+5:302017-02-23T00:28:33+5:30
केंद्र तसेच राज्य शासनाने कामगाराकरिता विविध योजना आखल्या आहेत.

कामगार योजनेच्या लाभापासून वंचित
तुमसरात कामगार नोंदणी कार्यालयच नाही : १९ कल्याणकारी योजना लाभ मात्र शून्य
राहुल भुतांगे तुमसर
केंद्र तसेच राज्य शासनाने कामगाराकरिता विविध योजना आखल्या आहेत. पंरतु कामगार नोंदणी कार्यालयाअभावी शहरी तसेच ग्रामीण कामगारापर्यंत माहितीच पोहचलेली नसल्यामुळे तालुक्यातील हजारो कामगार त्या कल्याणकारी योजनेच्या लाभापासून अजूनही वंचितच असल्याचे वास्तव्य सामोर आले आहे.
तुमसर तालुक्यात महिला व पुरुष कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. केंद्र तसेच राज्य शासनाने १९ प्रकारच्या कल्याणकारी योजना कामगार बांधव करिता काढल्या आहेत. त्यामध्ये कामगारांच्या मुलांना १ ते १२ वी पर्यंतच्या शिक्षण घेण्याकरिता २५०० ते १०००० रुपयापर्यंत आर्थिक सहायत्ता व उच्च शिक्षणासाठी २०००० रुपये ते एक लाखापर्यंत आर्थिक मदत देण्याची योजना आहे.
नियमानुसार शासन स्तरावर कामगाराच्या पहिल्या विवाह खर्चासाठी ३० हजार रुपये तर प्रसुतीसाठी १५ हजार रुपये शस्त्रक्रियेसाठी २० हजार रुपये, दैनंदिन खर्चाच्या वस्तू खरेदी साठी ३००० हजार रुपये दिले जातात.
ऐवढेच नव्हे तर कामगारांच्या कुटूंबीयांना गंभिर आजारासाठी एक लाख रुपये आर्थिक सहाय्य असा १९ प्रकारच्या योजनेचा समावेश आहे. पंरतु या कामगाराची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात नोंदणी होणे आवश्यक आहे. परंतु नोंदणी कार्यालय नसल्याने तशी नोंद अधिकृतरित्या होत नाही.
ज्या कामगारांनी तेथील ग्रामसेवक व शहरातील कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र घेवून सदर कार्यालयात नोंदणी करुन योजनेचा लाभ घेतला जावू शकतो. मात्र हे कार्यालय तालुक्यात नाही वा जनजागृती नाही त्यामुळे कामगार हे योजनेच्या लाभापासून वंचित राहीला आहे.