शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

निसर्गाची अवकृपा अन् प्रशासनाची दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST

गत खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच धान उत्पादकांच्या नशिबी थट्टा आणि अवहेलना आली आहे. निसर्गाचा मारा झेलत पिकविलेला धान घेण्यासाठी आता शासनच दिरंगाई करीत आहे. पवनी तालुक्यात आतापर्यंत ६८ हजार ८५ क्विंटल धानाची मोजणी झाली. मात्र त्यापेक्षा दुप्पट धान केंद्रावर आणि शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे.

ठळक मुद्देखरेदी केंद्रांवर धान पोती उघड्यावर। धान उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत

खेमराज डोये।लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव : घाम गाळून धान पिकविला. आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी नेला. परंतु गोदाम हाऊसफुल्ल असल्याने दोन महिन्यांपासून तो उघड्यावरच आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे शासनाचे दिरंगाईचे धोरण यामुळे पवनी तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. दैनंदिन खर्च आणि मुलामुलींचे लग्नसोहळे कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.गत खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच धान उत्पादकांच्या नशिबी थट्टा आणि अवहेलना आली आहे. निसर्गाचा मारा झेलत पिकविलेला धान घेण्यासाठी आता शासनच दिरंगाई करीत आहे. पवनी तालुक्यात आतापर्यंत ६८ हजार ८५ क्विंटल धानाची मोजणी झाली. मात्र त्यापेक्षा दुप्पट धान केंद्रावर आणि शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. आसगाव केंद्रावर २५ हजार ३० क्विंटल, पवनी केंद्रावर १७ हजार ६५२ क्विंटल, खातखेडा केंद्रावर ७१२८ क्विंटल, अड्याळ केंद्रावर १८ हजार २७४ क्विंटल धान खरेदी झाली आहे. मात्र त्यापेक्षाही अधिक धान आजही आधारभूत केंद्राच्या बाहेर विक्रीसाठी आहे. धानाने भरलेले पोते उघड्यावर असून त्याला पावसाचा फटका बसत आहे. उंदीर आणि घुशीही पोते कुरतडत आहेत. जुना बारदाना कुचकामी ठरत असून त्यातूनही धान जमिनीवर पडत आहे. अनेक केंद्रावर तर धान पोत्यालगत अंकुर फुटल्याचे दृष्य आहे. शासनाने धान खरेदीचे धोरण ठरविताना योग्य उपाययोजना केल्या असत्या तर शेतकऱ्यांवर ही अवस्थाच आली नसते. धानाची पोती जुनी असल्याने हमालाने पोते उचलल्यावर ते फाटत असल्याचे दृष्य अनेक केंद्रावर दिसते.धानच विकला जात नसल्याने शेतकºयांना आर्थिक विवंचनेचा फटका सहन करावा लागत आहे. अनेकांकडे पीक कर्ज आहे. ते कसे भरावे. दैनंदिन खर्च कसा भागवावा. मुलामुलींच्या लग्नासाठी तजवीज कुठून करावी असे अनेक प्रश्न आहेत.सेवा सोसायट्यांना गोदामाची परवानगी द्याजिल्ह्यातील ग्राम विविध सेवा सहकारी सोसायट्यांना गोदाम बांधण्याची परवानगी दिल्यास धान खरेदीचा प्रश्न सुटू शकतो. शासनाने अनुदान तत्वावर गोदाम उभारण्याची खरी गरज आहे. परंतु आजही भाड्याने गोदाम घेऊन त्यात धान साठविला जातो. त्यामुळे भाड्याचा फटकाही शासनाला सहन करावा लागतो. शासकीय धान खरेदीसाठी सेवा संस्थांना परवानगी द्यावी अशी मागणी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष पुंडलीक हत्तीमारे यांनी केली आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण