तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयात निदर्शने
By Admin | Updated: April 18, 2016 00:31 IST2016-04-18T00:31:11+5:302016-04-18T00:31:11+5:30
महाराष्ट्र राज्य तलाठी संघ विदर्भ पटवारी संघ नागपूर, रत्नगिरी सिंधदुर्ग जिल्हा तलाठी संघ या शासनमान्यता प्राप्त संघटना महाराष्ट्रातील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मागण्या शासनाकडे मांडत आहे.

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयात निदर्शने
प्रलंबित मागण्याची पूर्तता करा : अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
साकोली : महाराष्ट्र राज्य तलाठी संघ विदर्भ पटवारी संघ नागपूर, रत्नगिरी सिंधदुर्ग जिल्हा तलाठी संघ या शासनमान्यता प्राप्त संघटना महाराष्ट्रातील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मागण्या शासनाकडे मांडत आहे. या मागण्यांची पुर्तता २०१५ पर्यंत करण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्र्यानी दिले होते. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही मागण्य ापूर्ण झाल्या नाही. त्यामुळे शनिवारला साकोली येथील तहसील कार्यालयासमोर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी काळया फिती लावून मागण्यापूर्ण करण्यासाठी निदर्शने दिली.
तलाठी साझ्याची व महसूल मंडळाची पुर्नरचना व मंडळ कार्यालयाचे भाडे देण्यात यावे, सातबारा संगणीकृत व ई फेरफारमधील अडचणी, सॉफ्टवेअर दुरुस्ती, सर्वरची स्पीड, कनेक्टीव्हीटी, तलाठी, मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौण खनिज वसुली या कामातून तलाठी संवर्गास वगळणे, तलाठी कार्यालय बांधून देणे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पध्दतीचा अवलंब करणे, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यासाठी राखुन ठेवणे, अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू करणे या मागण्या शासनाने तत्काळ मंजूर करण्यात याव्या, अशी मागणी आहे. अन्यथा हे आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेतर्फेदेण्यात आला. यावेळी विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा साकोलीचे उपाध्यक्ष दिनेश सिडाम, मंडळ अधिकारी संजय बन्सोड, तलाठी शेखर ठाकरे, लालचंद बावनकर, गिता मेश्राम, सुनिता साखरवाडे, मंदा कारेमोरे, यु.एन. भोयर, नरेंद्र चवळे, होमेश्वर मदनकर, व्ही.टी. हटवार, एच.जी. खोब्रागडे, एस.पी. बिसेन, बी.एस.शिंदे, बी.के. मेश्राम, मनिषा उईके उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)