‘नैसर्गिक आपत्ती’चे प्रात्यक्षिक

By Admin | Updated: June 14, 2014 01:34 IST2014-06-14T01:34:14+5:302014-06-14T01:34:14+5:30

नैसर्गिक आपत्ती विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांच्या वतीने मान्सुनपूर्व तयारी

Demonstration of 'Natural Disaster' | ‘नैसर्गिक आपत्ती’चे प्रात्यक्षिक

‘नैसर्गिक आपत्ती’चे प्रात्यक्षिक

  भंडारा : नैसर्गिक आपत्ती विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांच्या वतीने मान्सुनपूर्व तयारी अंतर्गत मॉकड्रिलचे (रंगीत तालिम) प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. आपत्ती काळात शासकीय यंत्रणा किती लवकर व कशाप्रकारे प्रतिसाद देते, हे पडताळण्यासाठी उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे यांचे मार्गदर्शनात वैगंगा नदी पात्रात मॉकड्रिल करण्यात आले. या कार्यक्रमाअंतर्गत शोध व बचाव पथकातील पोहणाऱ्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मार्फत एकाा पोहणाऱ्यास पाण्यात बुडण्याचे नाट्यमय प्रसंग सादर करण्यात आले. सदर व्यक्तीच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून किनाऱ्यावर शोध व बचाव पथकाचे ५ तैराकी यांत्रिक बोट, लाईफ बॉईज व फलोटींग स्टेचरसह सज्ज ठेवण्यात आले. यानंतर फोन करुन माणुस बुडाल्याची बातमी पोलिस नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना कळविण्यात आले. फोनवर सुुचित केल्यानंतर सदर यंत्रणा किती वेळात प्रतिसाद देऊन बुडालेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी काय उपाययोजना करतात ते नोंदविण्यात आले. घटनास्थळी १५ मिनिटात सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी सुधाकर कुळमेथे, तहसीलदार सुशांत बंसोडे व तलाठी पी.सी. राऊत हे ३ पोहणाऱ्यांसोबत दाखल झाले. त्यानंतर क्षणातच जिल्हाधिकारी आपत्ती नियंत्रण कक्षातील शोध व बचाव पथक नौका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदारांनी आणलेले तैराकी यांनी नौकेवर स्वार होऊन बुडणाऱ्या व्यक्तीस वाचविण्यासाठी बचावकार्य सुरू केले. त्या बुडालेल्या व्यक्तीला किनाऱ्यावर आणून घटनास्थळी पोहचलेल्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय तज्ञांनी प्रथमोपचार दिला. त्यानंतर पोलीस विभागाने योग्य ती कार्यवाही केली. हा कार्यक्रम हा आपत्ती काळात शासकीय यंत्रणा किती लवकर व कशाप्रकारे प्रतिसाद देते. हा सगळा घटनाक्रम झाल्यावर सर्वांना सांगण्यात आले. यानंतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नामदास यांनी उपस्थितांना बुडालेल्या इसमास कसे वाचवावे व प्रथमोपचार द्यावे, याबद्दल प्रात्यक्षिक दाखविले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Demonstration of 'Natural Disaster'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.