शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

विजुक्टाचे शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 05:00 IST

शिक्षकांना १०, २०, ३० त्रिस्तरीय वेतनश्रेणी देण्यात यावी.  डीसीपीएसमधून एनपीएसमध्ये हस्तांतरित शिक्षकांचे अद्यावत हिशेब देण्यात यावे, उच्च माध्यमिक तुकडीतील विद्यार्थी पटसंख्याचे निकष बदलून माध्यमिकप्रमाणे करण्यात यावेत. क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश रद्द करून अनुदानित किंवा टप्पा अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयास वळते करावे. नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व विनाअनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.  त्रुटीपूर्ण, तसेच अघोषित उच्च माध्यमिक विद्यालयांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान द्यावे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर असोसिएशन जिल्हा संघटनेतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी करण्यात आले.गत अनेक महिन्यांपासून ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांचे वेतन महिन्याच्या शेवटी उशिरा होतात. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्येला घेऊन तसेच शिक्षकांना १०, २०, ३० त्रिस्तरीय वेतनश्रेणी देण्यात यावी.  डीसीपीएसमधून एनपीएसमध्ये हस्तांतरित शिक्षकांचे अद्यावत हिशेब देण्यात यावे, उच्च माध्यमिक तुकडीतील विद्यार्थी पटसंख्याचे निकष बदलून माध्यमिकप्रमाणे करण्यात यावेत. क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश रद्द करून अनुदानित किंवा टप्पा अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयास वळते करावे. नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व विनाअनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.  त्रुटीपूर्ण, तसेच अघोषित उच्च माध्यमिक विद्यालयांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान द्यावे. उच्च माध्यमिक शिक्षकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण द्यावे, तसेच शिक्षण शुल्क रक्कम देण्याची देण्याची व्यवस्था करावी. घड्याळी तासिका व शिक्षण सेवकांचे मानधन वाढविण्यात यावे. नवीन शिक्षकांच्या नियुक्त्या त्वरित करण्यात याव्यात. माहिती व तंत्रज्ञान विषयाला अनुदान देण्यात यावे. पीएचडी, एम.फिल अशी अहर्ता प्राप्त केलेल्या उच्च माध्यमिक शिक्षकांना एक अधिकची वेतनवाढ देण्यात यावी. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ यावर १० वी व १२ वी वर्गांना शिकविणाऱ्या, तसेच कार्यरत शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. नवीन स्वयंअर्थसहाय्याने तुकड्या बृहत आराखड्याप्रमाणे देण्यात याव्यात. निवृत्तीचे वय ६० करण्यात यावे. १ तारखेला वेतन शिक्षकांना देण्यात यावे, वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र शिक्षकांना प्रशिक्षणाची अट शिथिल करून त्यांना ती देण्यात यावी. निवड श्रेणीमध्ये असलेल्या अन्यायकारक अटी रद्द करण्यात याव्यात, अशा विविध मागण्यांसाठी जिल्हा स्तरावर विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर असोसिएशन जिल्हा संघटना भंडारा यांच्यातर्फे धरणे आंदोलन देण्यात आले. यापूर्वी तालुक्याच्या ठिकाणी संघटनांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना तहसीलदारांमार्फत पाठवण्यात आले.  आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून जिल्हास्तरावर धरणे आंदोलन झाले. या आंदोलनाचे नेतृत्व विजुक्टा जिल्हाध्यक्ष प्रा. मार्तंड गायधने, सचिव राजेंद्र दोनाडकर, विदर्भ कार्यकारिणी सदस्य प्रा.गौपाले, प्रांतीय सदस्य प्रा. सैंग कोहपरे, प्रा. सुनील सावरकर,प्रा. सहारे, प्रा. देशभ्रतार, प्रा. कारेमोरे, प्रा. जांभुळे, प्रा. डांगे, प्रा. किरणापुरे, प्रा. सिंगनजुडे, प्रा.मेंढे, प्रा सहारे, प्रा. माकडे, प्रा. संजय पाटील, प्रा. गोंधळे, प्रा. लेनगुरे, प्रा. मोहतुरे, प्रा. बांबोडे यावेळी उपस्थित होते.शिक्षकांचा आक्रोशगत अनेक महिन्यांपासून ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांचे वेतन महिन्याच्या शेवटी उशिरा होते. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून जिल्हास्तरावर धरणे आंदोलन झाले. या आंदोलनात शिक्षकांनी आक्रोश व्यक्त करून प्रलंबित समस्या सोडविण्याची मागणी केली.

 

टॅग्स :Educationशिक्षण