उच्चस्तरीय समितीसमोर अग्निकांडाचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:33 IST2021-01-13T05:33:06+5:302021-01-13T05:33:06+5:30

या पथकात सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक तथा आरोग्य सेवा आयुक्त ...

Demonstration of fire in front of a high level committee | उच्चस्तरीय समितीसमोर अग्निकांडाचे प्रात्यक्षिक

उच्चस्तरीय समितीसमोर अग्निकांडाचे प्रात्यक्षिक

या पथकात सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक तथा आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एम., महाराष्ट्र फायर सर्व्हिसेसचे संचालक प्रभात रहांगडाले, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे आणि आरोग्य सेवा उपसंचालक संजय जयस्वाल उपस्थित होते. या पथकाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्या कक्षात बसून सुरुवातीला बंदद्वार चर्चा केली. त्यानंतर विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर रुग्णालय परिसराची बाहेरून पाहणी केली. जिल्हाधिकारी संदीप कदम, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

बॉक्स

समितीचा डेरा भंडाऱ्यात

मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेली समिती भंडारा अग्निकांडाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत डेरेदाखल राहणार आहे. मंगळवारी या समितीने विविध माहिती संकलित केली. ही समिती या अग्निकांडाची संपूर्ण चौकशी करून आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे. या अहवालावरच कारवाईची दिशा निश्चित होणार आहे.

Web Title: Demonstration of fire in front of a high level committee