ठाणा येथे तलाठी कार्यालयाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST2021-09-23T04:39:56+5:302021-09-23T04:39:56+5:30

शहापूर मंडळ कार्यालयांतर्गत परसोडी ठाणा या तलाठी साझा क्रमांक दोनचे विभाजन करून नव्याने साझा ठाणा तलाठी कार्यालय निर्मिती करण्यात ...

Demand for Talathi office at Thane | ठाणा येथे तलाठी कार्यालयाची मागणी

ठाणा येथे तलाठी कार्यालयाची मागणी

शहापूर मंडळ कार्यालयांतर्गत परसोडी ठाणा या तलाठी साझा क्रमांक दोनचे विभाजन करून नव्याने साझा ठाणा तलाठी कार्यालय निर्मिती करण्यात आली आहे. गत चार वर्षापासून ठाणा साझाला कार्यालय मिळत नसल्याने परसोडी साझा क्रमांक दोनमधून व्यवहार सुरू होते. लोकांचे कामाची गर्दी पाहता व तलाठी कार्यालयाची व्यवस्था पाहता लोकांचे कामे जलद गतीने होणे शक्य नव्हते. शासकीय कामाकरिता खोली आणि लॅपटॉप प्रिंटरची व्यवस्था नसल्यामुळे आणि जोपर्यंत व्यवस्था होत नाही, तो पर्यंत ठाणाला कार्यालयीन दिवस ठरवून ठाणाच्या लोकांना काम करणे सोयीचे होईल असे ठरवावे. नवनियुक्त ठाणा साझाचे कार्यालय उघडावे, या आशयाचे निवेदन माजी सरपंच आरती मेश्राम यांनी सरपंच सुषमा पवार व कमिटीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Demand for Talathi office at Thane