राष्ट्रीयकृत बँक सुरु करण्याची मागणी

By Admin | Updated: January 14, 2015 23:03 IST2015-01-14T23:03:22+5:302015-01-14T23:03:22+5:30

लाखांदूर तालुक्यातील दिघोरी हे सर्वात मोठे गाव आहे. गावात राष्ट्रीयकृत बँकेची कोणतीही शाखा नसल्याने येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Demand for setting up a Nationalized Bank | राष्ट्रीयकृत बँक सुरु करण्याची मागणी

राष्ट्रीयकृत बँक सुरु करण्याची मागणी

दिघोरी (मोठी) : लाखांदूर तालुक्यातील दिघोरी हे सर्वात मोठे गाव आहे. गावात राष्ट्रीयकृत बँकेची कोणतीही शाखा नसल्याने येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
दिघोरी मोठी येथे मध्यवर्ती सहकारी बँक व विदर्भ कोकण ग्रामीण बँक अशा दोन बँका आहेत. मात्र, दोन्ही बँकातून ताबडतोब धनाकर्षाची सोय उपलब्ध होत नाही व बँक कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून धनाकर्ष उपलब्ध जरी करून दिली तरी विविध स्पर्धा परीक्षा, सैन्यभरती तसेच विविध योजनेसाठी राष्ट्रीयकृत बँकेचाच धनादेश हवा अशी अट असल्याने या बँकातील धनादेशाला महत्वच उरत नाही. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, पशु दवाखाना, वनविभाग कार्यालय, पोलीस ठाणे, दोन कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, तलाठी कार्यालय, सेतू केंद्र आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आहे. त्यामुळे नेहमीच राष्ट्रीयकृत बँकेशी यांना संलग्न असावे लागते. गावात राष्ट्रीयकृत बँक नसल्याने सानगडी किंवा लाखांदूरवर येथील नागरिकांना व कर्मचाऱ्यांना विसंबून राहावे लागते.
येथील तरुण बेरोजगार विविध स्पर्धा परीक्षेला बसतात. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचाच धनादेश लागतोे. राष्ट्रीयकृत बँकेच्या विविध लाभदायी योजना किसान क्रेडीट कार्ड, कंत्राटी शेती, कृषी जमीन योजना, शेतकरी विकास योजना व विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाच्या योजनेपासून वंचित राहावे लागत असते. येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उघडण्याची मागणी शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार व व्यापारी वर्गाने केली आहे. येथे सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी राहतात, मात्र त्यांच्याकडून बँकेची मागणी करण्यात आलेली नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी मंडळाने ग्रामसभेत ठराव मांडून राष्ट्रीयकृत बँकेची मागणी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Demand for setting up a Nationalized Bank