भोजापूर ते खोकरला रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी
By Admin | Updated: March 19, 2015 00:31 IST2015-03-19T00:31:55+5:302015-03-19T00:31:55+5:30
भोजापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील भोजापूर ते खोकरला या रस्त्याचे संबंधित विभागाने तत्काळ डांबरीकरण करावे, अशी मागणी आहे.

भोजापूर ते खोकरला रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी
भंडारा : भोजापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील भोजापूर ते खोकरला या रस्त्याचे संबंधित विभागाने तत्काळ डांबरीकरण करावे, अशी मागणी आहे.
भोजापूर ते खोकरला या गावाकडे जाणारा रस्ता मातीचा असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने सायकलस्वार, दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना प्रवास करताना त्रासदायक ठरत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वेळोवेळी करण्यात येत असली तरी संबंधित विभागाचे या रस्त्याकडे हेतुपुरस्सर अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर रस्त्याचे डांबरीकरण झाल्यास भोजापूर परिसरातील नागरिकांना खोकरला मार्गे सातोना, खात, रामटेककडे जाण्यायेण्यास सोईस्कर होणार आहे. नागरिक व वाहनधारकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून असंतोष पसरत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे सर्वेक्षणासह मोका पंचनामा तयार करावा. व डांबरीकरणाचे काम तातडीने करण्याची मागणी माजी उपसरपंच लक्ष्मण मेश्राम यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)