दिवाबत्ती व स्वच्छता कर शिथिल करण्याची मागणी

By Admin | Updated: August 24, 2015 00:50 IST2015-08-24T00:50:44+5:302015-08-24T00:50:44+5:30

नगर परिषद कार्य क्षेत्रातील मालमत्ता धारकांवर वर्ष २०१५-१६ पासून दिवाबत्ती कर तसेच स्वच्छता कराचा अतिरिक्त बोझा लादण्यात आला.

The demand for relaxation of the lamp and cleanliness tax | दिवाबत्ती व स्वच्छता कर शिथिल करण्याची मागणी

दिवाबत्ती व स्वच्छता कर शिथिल करण्याची मागणी

काँग्रेसचे निवेदन : सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले
तुमसर : नगर परिषद कार्य क्षेत्रातील मालमत्ता धारकांवर वर्ष २०१५-१६ पासून दिवाबत्ती कर तसेच स्वच्छता कराचा अतिरिक्त बोझा लादण्यात आला. तो शिथिल करण्यात यावा याकरिता तुमसर शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले.
तुमसर शहरात नवनवीन विकासात्मक कार्य होत असून शहराचा कायापालट होतांना दिसत आहे. ते प्रशसनिय आहे. परंतु गत वर्षीच २०१४-१५ मध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून नवीन कर निर्धारण करण्यात आले. लागू करण्यात आलेला नवीन करामुळे नागरिकांचे आधीचेच कंबरडे मोडले गेले असतांना त्यात आणखी दिवाबत्ती व स्वच्छता कर आकारणे संयुक्तिक वाटत नसून नागरिकांचे हित लक्षात घेता १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीच्या मालमत्ता करातील दिवाबत्ती तसेच स्वच्छता कर शिथिल करावा अशी मागणी तुमसर शहर काँग्रेस कमेटीने केली आहे.
याबाबत नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात सुरेंद्र पाटील, अरविंद कारेमोरे, अनिल बावनकर, शालीकराम गौरकर, सिमा भुरे, प्रमोद तितीरमारे, योगिता बावनकर, प्रकाश शहारे, राजेश ठाकूर, शैलेश पडोळे, लोकेश साठवणे, सुरेंद्र चिंधालोरे, पे्रमदास राऊत, अरविंद जोशी, कान्हा बावनकर, यशवंत गायधने, प्रकाश कुंजेकर, विजय गिरीपुंजे, दिलीप चोपकर, दिनेश भवसागर यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The demand for relaxation of the lamp and cleanliness tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.